लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्य सुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥...