Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती
Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:22 IST)
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !! 
उजळल्या पंचप्राण ज्योती ! सहजचि ओवाळू आरती !
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती ! हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती !
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी ! जणू का भाविकास जननी !!
संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास !
करी कामधेनु आमुची ! करू या ज्ञानसागराची !! १!!
 
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
ध्यान हे रम्य मनोहर से ! ध्यान धृड जडले नयनिसे !
भक्त हृदयाकाशी विलसे ! तेज ब्रम्हांडी फाकतसे !
पितांबर शोभवित कटीला ! भक्त मालिका हृद पटला !!
भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी !
करू नित्य सेवा चरणांची ! करू या ज्ञानसागराची !! २ !!
 
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
लक्षी जग प्रचंड नीज नयनी ! लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी !!
हरिहर विधी, दत्त त्रिगुणी ! आठवी नित्यभूवन सुमनी !!
दत्तमय असे योगिराणा ! ओम कारीचे तत्व जाणा !!
धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण !
आस पुरवावी दासांची ! करू या ज्ञानसागराची !! ३ !!
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
 
!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय !!

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा

ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा

ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

ज्ञानेश्वरी अध्याय नववा

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

पुढील लेख
Show comments