आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता । चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥ तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥ पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती । ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥...