Festival Posters

जाणून घ्या तुमचे साप्ताहिक भविष्यफल

Webdunia
शनिवार, 20 जुलै 2019 (16:57 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती अस्थिर राहील. इतरांकडून येणे असलेला पैसा विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावर राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. कोणतेही काम सहसा अपूर्णतेच्या मार्गावर राहणार नाही. 
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या घटना व घडामोडी अनुकूलतेच्या ठरतील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊ शकेल. अंतिम चरणात आर्थिक आवक गरजेपुरतेच राहील. तसेच पारिवारीक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर काही बाबतीत सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. 
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे भावी काळासाठी अडचणीचेच ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात लाभदायक स्वरूपाच्या घडामोडी घडतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीत राहतील व वेळेवर सहकार्य मिळेल. कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना करावा लागणार नाही. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नियोजित खर्चापेक्षा अधिक प्रमाणात खर्च करावा लागेल. कर्ज प्रकरणातून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. 
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या व प्रश्न मनोनुकूलरीत्या मिटतील. व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत अधिकारीवर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहून त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होईल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवासयोग जुळून येईल. प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम सार्थकी ठरतील. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार गतिमान होऊन मनोनुकूलरीत्या पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहनापासून धोका संभवतो. हातातील कामात विविध प्रकारचे अडथळे येतील. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे उचित ठरेल. भावी काळात होणारा परिणाम काही प्रमाणात हितावहच ठरू शकेल. शांतता व संयम ठेवणेच चांगले राहील. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्य यशस्वितेचाच सिद्ध होईल. 
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. आपले मार्गदर्शन सहकारी वर्गासाठी विशेष लाभदायक स्वरूपाचे ठरेल. मानसिक शांतता टिकून राहून काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात सर्वत्र सावधानता ठेवूनच वाटचाल करणे हितप्रद ठरेल. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे भावी काळाच्या दृष्टीने अडचणीचेच ठरेल. 
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मनोनुकूलरीत्या मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढेल. मानसिक शांतता टिकून राहू शकेल. अंतिम चरणात कार्यसभोतालीन परिस्थिती सहकार्य मिळवून देणारी राहील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. आनंद वाढेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेत यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. आर्थिक गुंतवणुकीवरील फायदे मिळतील व आर्थिक गुंतवणूक भावी काळाच्या दृष्टीने फायदेशीरच ठरेल. मानसिक समाधान लाभेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीच्या कारवाया थांबतील. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा प्रय▪जारी करतील. आरोग्याच्या तक्रारी मिटण्याच्या मार्गावर राहतील.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक वातावरण मानसिक समाधान मिळवून देणारे राहील. पारिवारीक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील. यश समोर दिसेल. अंतिम चरणात संततीबाबत आनंदवार्ता येतील. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील. हातात पैसा खेळता राहील. 
 
मीन :  सप्ताहाच्या प्रथम चरणात अपेक्षितरीत्या सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारी कामगिरी हातून घडेल. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून उचित मानसन्मान गौरव सोहळा आयोजित केला जाईल व मानसिक सुख लाभेल. अंतिम चरणात पारिवारीक सदस्य मनोनुकूलरीत्या व अपेक्षितरीत्या मदतीचा हात पुढे करतील. कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील. कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. यशाचा मार्ग खुला राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Rang Panchami 2026 : रंगपंचमीचा सण कधी साजरा केला जाईल, त्याचे महत्त्व आणि कथा काय आहे?

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

Shubh Shukrawar Mahalakshmi Poster for Status in Marathi शुभ शुक्रवार संदेश

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Holashtak 2026: होलाष्टक म्हणजे काय? महाराष्ट्रात खरंच शुभ कार्ये वर्ज्य असतात का? पाहा शास्त्र काय सांगतं

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments