Festival Posters

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: मिथुन

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2019 (17:16 IST)
मिथुन राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला प्रेम जीवन अत्यंत अनुकूल असल्याचे दिसते. या दरम्यान आपण आपल्या पार्टनरसह आनंदाचे क्षण घालवू शकतात. तरी कोणत्याही प्रकाराची अती कामाची नाही. 
 
या वर्षी जानेवारी ते मे या दरम्यानचा काळ आपल्या प्रेम जीवनासाठी अत्यंत अनुकूल राहील. या दरम्यान आपण प्रेमाच्या क्षणांचा भरपूर आनंद घ्याल. याने आपल्याला नात्यातील गोडवा वाढेल आणि एकमेकांप्रती आकर्षण देखील वाढेल.
 
ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान जरा सांभाळून राहा कारण या दरम्यान कौटुंबिक कामात व्यस्त असल्यामुळे पार्टनरला अधिक वेळ देऊ शकणार नाही ज्यामुळे तक्रार होऊ शकते. या दरम्यान वाद, भांडण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही ज्याचे वाईट परिणाम नात्यावर पडू शकतात.
 
जर आपण आपल्या पार्टनरशी विवाह करू इच्छित असाल तर ऑगस्ट आणि डिसेंबरच्या महिन्यात आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. म्हणून आपल्या मनाची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी हे महिने उत्तम ठरतील ज्यात नकार मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असेल. परंतू या नात्याला सन्मान देणे आणि समान दर्जा देणे देखील आवश्यक आहे. आपल्या वाक् चातुर्याने आपण प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकाल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

मृत्यूनंतर या लोकांना भोगावी लागते नरकाची शिक्षा, गरुड पुराणात आहे उल्लेख

Mohini Ekadashi 2026 मोहिनी एकादशी कधी? पूजा विधी आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना प्रसन्न करा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments