Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात त्वचेवर लावा, रोजमेरी आणि पुदिन्याचा फेसपॅक

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (19:30 IST)
उन्हाळा सुरु झाला आहे. तसचे त्वचेच्या समस्या देखील सुरु होतात. उन्हाळ्यामध्ये घाम येतो, चेहरा ऑईली होतो, पुरळ येतात, त्वचेची जळजळ यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. हे पाहायला मिळते की, त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात. जेव्हा की, तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. या वातावरणात त्वचेला थंडावा येऊन त्वचेला उजळ बनवण्यासाठी फेसपॅकचा वापर करू शकतात. जर तुम्ही रोजमेरी आणि पुदिन्याच्या मदतीने फेसपॅक बनवला तर तुमच्या त्वचेला खूप फायदा मिळेल. 
 
*रोजमेरी-पुदिना हाइड्रेटिंग फेसपॅक 
उन्हाळ्यामध्ये सारखा घाम येतो व त्यामुळे त्वचेला अतिरिक्त हाइड्रेशनची गरज असते. अश्यावेळेस हा फेसपॅक तुम्ही वापरू शकतात. 
आवश्यक साहित्य-
2 मोठे चमचे रोजमेरी
2 मोठे चमचे पुदिन्याची पाने 
1 मोठा चमचा मध 
1 मोठा चमचा साधे दही
 
उपयोग कसा करावा-
सर्वात पहिले रोजमेरी आणि पुदिन्याची पाने यांना एकत्र बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये  मध आणि दही टाकून चांगले मिक्स करा. तयार मिश्रणाला चाऱ्यावर आणि मानेवर लावावे. याला 15-20 मिनट लावून ठेवावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे आणि हलक्या हाताने पुसावे. 
 
*रोजमेरी-पुदिना क्लींजिंग फेसपॅक 
उन्हाळ्यात त्वचेला डीप क्लीन करण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करू शकतात. 
आवश्यक साहित्य-
1 मोठा चमचा कोरडी रोजमेरी
1 मोठा चमचा वाळलेले पुदिन्याची पाने  
1 मोठा चमचा ओटमील
आवश्यकतेनुसार गुलाब जल  
 
कसा करावा उपयोग 
एका बाऊलमध्ये कोरडी रोजमेरी, पुदिन्याचे पाने आणि ओटमील मिक्स करा. आता यामध्ये थोडे गुलाबजल मिक्स करा. म्हणजे एक मऊ फेसपॅक बनेल. आता तयार केलेल्या फेसपॅकला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. याला 15-20 पर्यंत लावून ठेवावे. मग कोमट पाण्याने धूवावे व हलक्या हाताने पुसावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Mother's Day 2024: मातृदिनाचा इतिहास जाणून घ्या

घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

पुढील लेख
Show comments