Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beauty Care : तळवे स्वच्छ असतील तर चेहरा उजळेल,जाणून घ्या तळव्यांची काळजी कशी करावी

Webdunia
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (16:17 IST)
तळव्यांना शरीराचे दुसरे हृदय म्हणतात,कारण तळव्यावर गादीप्रमाणे मासळ भाग असतो,या वर अनेक छिद्र असतात.याचा आकार त्वचेच्या रोमछिद्रापेक्षा मोठा असतो.जेव्हा आपण चालतो तेव्हा या गादीवर संपूर्ण शरीराचा दबाव पडतो.या मुळे हे छिद्र प्रसरण पावतात.
 
या रोम छिद्रांमधून ऑक्सिजन आत शिरते.आणि गादीतील टॉक्सिन घामाच्या स्वरूपात बाहेर पडतात.गादीवर दबाव पडल्यावर रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि रक्त वेगाने वर पाठवले जाते.हेच कारण आहे की पायी चालण्याचा हृदय रोगींना सर्वाधिक फायदा होतो.
 
 जर पायाचे तळवे गलिच्छ, फाटलेले असतील तर शरीराची त्वचा देखील अशी असेल. कारण स्पष्ट आहे की जर तळवे स्वच्छ ठेवले आणि नियमितपणे त्यांची  मालिशकेली तर शरीराच्या त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि चांगल्या प्रकारे रक्त मिळते, म्हणूनच असे म्हटले जाते की 'जर तळवे चमकतील तर चेहरा चमकेल'.
 
तळव्यांची काळजी घेणे-
* रात्री झोपण्यापूर्वी तळवे स्वच्छ करा आणि 3 मिनिटे गरम आणि 1 मिनिट थंड  शेक किमान तीन वेळा घ्या.
 
* तळव्यांची नियमितपणे मालिश करा. तळव्याच्या प्रकृतीनुसार मालिश करण्यासाठी तेल निवडा. कोरड्या आणि घामाच्या तळव्यांसाठी व्हॅसलीन आणि चंदन तेलाने मालिश करा. मुले आणि स्त्रियांच्या कोरड्या आणि कडक टाचांमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि चाळ मोगरा तेल ,मोहरीचे तेल, व्हॅसलीन आणि लिंबू मिसळून तळव्यांची आणि टाचांची मालिश करा आणि ज्या तळयांमध्ये स्पंज कमी झाला आहे, तिथे ताण आहे आणि टाचांमधून रक्त आल्यास शंखपुष्पी आणि नारळाच्या तेलाने मालिश करा.
 
* सकाळी आंघोळ करताना तळवे हलके घासून स्वच्छ करा.आंघोळ केल्यानंतर साध्या मोहरीचे तेल लावा.
 
* उंच टाचांची चप्पल, सॅंडील आणि शूजचा वापर करणे टाळा, कारण यामुळे रक्तप्रवाह असामान्य होतो.
 
* दररोज 15 ते 20 मिनिटे गवत किंवा हलकी ओल्या मातीमध्ये अनवाणी आवर्जून चाला.
 
* तळ्यांचे स्पंज वाढवण्यासाठी माती किंवा खडीवर उडी मारा.अस केल्याने, मध्यवर्ती मज्जासंस्था वेगाने विकसित होते आणि संतुलित हार्मोन्स स्राव होण्यास मदत होते. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

सर्व पहा

नवीन

पावसाळा स्पेशल बनवा कुरकुरीत कांदा भजी, रेसिपी जाणून घ्या

ह अक्षरावरून मुलांची मराठी नावे H अक्षरावरून मराठी मुलांची नावे

Vaginal Odors मासिक पाळी दरम्यान योनीतून वास येतो का? तर जाणून घ्या कारणे आणि उपाय

Diabetes च्या रुग्णांनी पावसाळ्यात या 5 गोष्टी कराव्यात, Sugar Leval राहील नियंत्रणात

Shirshasana Benefits : शीर्षासनाचे फायदे आणि तोटे

पुढील लेख
Show comments