Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Coconut Oil Benefits: चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे, सुरकुत्या नाहीशा होतील

Webdunia
बुधवार, 27 एप्रिल 2022 (14:14 IST)
सुंदर आणि उजळलेला चेहरा कोणाला नको असतो? या साठी महिला किंवा मुली सहसा सर्व प्रकारच्या टिप्स अवलंबवतात.अशा लोकांसाठी खोबरेल तेल देखील खूप फायदेशीर आहे. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात. अशा परिस्थितीत यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. याशिवाय खोबरेल तेल तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर करते. चला जाणून घेऊया नारळाचे तेल चेहऱ्यासाठी कसे फायदेशीर आहे.
 
* चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, चेहरा चमकेल-
नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन-ई आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत हे तेल सीरमचेही काम करते. हे तेल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील तजेलता  वाढते. खरं तर, खोबरेल तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे ते चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुधारतो. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावू शकता.
 
* चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील-
याशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या असेल तर खोबरेल तेल नक्कीच लावावे. या तेलात अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात त्यामुळे चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या दूर होतात.
 
* ओलावा टिकून राहील
बदलत्या हवामानामुळे बहुतांश लोकांचा चेहराही कोरडा पडू लागतो. अशा स्थितीत  चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलचा वापर करावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहील.
 
 * चेहऱ्यावरील डाग दूर होतील
प्रदूषण आणि चुकीच्या अन्नामुळे चेहऱ्यावर अनेक प्रकारचे डाग पडतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेल देखील वापरू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी हळुवार हाताने चेहऱ्याला नारळाच्या तेलाने मसाज करा, साधारण 5ते 10 मिनिटे मसाज केल्यावर असेच राहू द्या, चेहऱ्यावरील डाग दूर होतील. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments