rashifal-2026

असे खुलवा दिवाळीत सौंदर्य

Webdunia
दिवाळीत घराची साफ-सफाई, रोषणाई, खरेदी, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनविणे या व अशा प्रकारच्या अनेक कामांना अक्षरश: उधाण आलेले असते. घरातील गृहिणी ही कामे करण्यात इतकी मग्न झालेली असते की तिला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. कामाच्या घाईगडबडीत झालेल्या दुर्लक्षामुळे दिवाळीत तिचा चेहरा पार कोमेजून जातो. अशा कोमेजलेल्या चेहर्‍यावर कितीही मेकअप केला तरीही तो खुलून दिसत नाही. सजण्यातच स्त्रीचे सौंदर्य सामावले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी खालील टिप्स वाचा.
 
* बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धुळ व माती तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका.
* नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसेच मानेवर मॉलिश करून 5 मिनिटे वाफ घ्या. 
* 2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाबाचे पाणी, 1 चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल.  
* यानंतर हाथ व पायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, 3 ते 4 थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय 10-15 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हाथ व पाय साध्या पाण्याने धुऊन मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील. 
* यानंतर तुमची वेशभुषा ठरवून घ्या. दिवाळीसारख्या शुभप्रसंगी घागरा, राजस्थानी ड्रेस, गुजराती साडी किंवा यासारखा तुम्हाला आवडणारे विशेष ड्रेस परिधान केले तर तुमचे रूप अजूनच खुलून दिसेल. 
* दागिने निवडताना परंपरागत साडीसोबत टिकली, नथ, कानांमध्ये झुमके, खड्याच्या किंवा मोतीच्या बांगड्या, पायात जाडसर किंवा मोतूचे पैंजण व कमरेत झुमका या गोष्टींना प्राधान्य दिले तर तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल. हे दागिने सध्या कमी किंमतीत व परवडतील अशा भावात इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत. 
* या सुंदर रूपावर तुम्हाला शोभेल व आवडेल अशी कोणतीही केशरचना करून स्वत:चे सौंदर्य वाढवा. चेहर्‍याच्या ठेवणीनुसार सैल वेणी, अंबाडा किंवा सागर वेणी यांची निवड करू शकता. या वेणीला बीड्स, मोती किंवा फुलानी सजवा. 
* सगळ्यात शेवटी चेहर्‍याचा मेकअप करा. सगळ्यात आधी चहर्‍यावर बर्फ चोळा. याने तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील. नंतर चेहर्‍यावर मॉयश्चराइजर लावा. नंतर तुमच्या रंगाला शोभून दिसेल त्या रंगाचे फाउंडेशन लावा. कॉम्पॅट पावडरने चेहर्‍याला 'एक्स्ट्रा टच' द्या. नंतर टाल्कम पावडर लावा. कपाळावर व नाकावर ड्रेसाच्या रंगाला मँचिंग ब्लशर लावा. नंतर डोळवांवर आयशॅडो लावा.डोळ्यांना व्यवस्थित आकार देण्यासाठी आयलाइनर किंवा आय ब्रो पेंसिलचा वापर करा. नंतर पापण्यांवर मस्करा लावा. सगळ्यात शेवटी तुमच्या कपड्यांच्या रंगाशी मेळ खाणारी लिपस्टिक व सुंदर टिकली लावा. आता पहा सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील. आणि हो तुमच्या चेहर्‍यावरील तुमचे हास्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उठावदार बनवेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Rajmata Jijau Jayanti 2026 Speech in Marathi राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी

प्रत्येक घासात गोड-आंबट चव; नक्की बनवून पहा टोमॅटो ढोकळा रेसिपी

हिवाळ्यात या प्रकारे तीळ खा, तुमचे शरीर निरोगी राहील

भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भरती: 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी

फेसवॉश नाही तर स्वयंपाकघरातील हे घटक चेहरा उजळवणार

पुढील लेख
Show comments