Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेहऱ्याचे स्क्रब करण्याची योग्य पद्धत, करू नका या पाच चुका

Webdunia
शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (11:30 IST)
स्क्रब करण्यापूर्वी फेसवॉश आवर्जून करावा. तसेच स्क्रब करण्यापूर्वी स्टीम घेणे लाभकारी आहे. स्क्रबला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करणे गरजेचे आहे. स्क्रब आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. ज्यामुळे आपली त्वचा उजळते व स्वच्छ होते. चेहऱ्याची स्क्रबिंग करण्याची योग्य पद्धत माहीत असणे गरजेचे असते. ही एक महत्वपूर्ण स्टेप आहे. जी त्वचेला स्वच्छ चमकदार आणि आरोग्यदायी बनवण्यासठी मदत करते. पण चुकीच्या पद्धतीने स्क्रब केल्यामुळे त्वचेला नुकसान देखील होऊ शकते. चला जाणून घेऊ या स्क्रब करण्याची योग्य पद्धत 
 
स्क्रबिंग काय आहे?
स्क्रबिंग एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये एक विशेष प्रकारचे फिजिकल एग्जफोलिएटरचा उपयोग केल्याने त्वचाची दुरुस्ती केली जाते. या प्रक्रियामध्ये उपयोग केले जाणारे स्क्रबमध्ये छोटे-छोटे ग्रैन्यूल्स असतात, जे त्वचेची चमक, स्वछता वाढवायला मदत करतात. 
 
स्क्रबिंग करण्याचे फायदे 
1. जीर्ण त्वचेला काढते- स्क्रब केल्याने त्वचेच्या वरील जीर्ण झालेली त्वचा निघण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेचा उजाळपणा वाढतो.
 
2. पोर्सची स्वछता- स्क्रब केल्याने त्वचेचे पोर्स स्वच्छ होतात आणि उघडतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ चमकदार दिसते. 
 
3. त्वचाच्या टेक्सचरला सुधारते- स्क्रब केल्याने त्वचेचे टेक्सचर सुधारते. ज्यामुळे त्वचा उजळ आणि चमकदार होते. 
 
4. कोरडया त्वचेला ओलावा प्रदान करते- त्वचा कोरडी झाल्यावर स्क्रबिंग केल्याने त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो. ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. 
 
5. लक्षपूर्वक धुवावे- स्क्रब केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला स्वच्छ धुवावे. 
 
6. नियमित स्क्रब करावे- त्वचेची स्क्रबिंग नियमित करावी. आठवड्यातून एकदा स्क्रब करावे किंवा आरोग्यदायी त्वचेसाठी योग्य राहिल तेवढे स्क्रब करावे. 
 
सावधानी 
1. जास्त दबाव न टाकणे- स्क्रब करतांना जास्त दबाव टाकू नका. कारण हे त्वचेला नुकसान करू शकते. 
 
2. स्क्रबचा वारंवार उपयोग करू नका- स्क्रबचा वारंवार उपयोग त्वचेला कोरडे करू शकतो, याकरिता वारंवार स्क्रब करू नका. 
 
3. चेहऱ्याला जवळून स्क्रब करू नका-  त्वचेच्या नाजुक भागाला नुकसान होऊ नये म्हणून चेहऱ्याला जवळून स्क्रब करू नका. 
 
4. चेहऱ्याला स्क्रब करण्यापूर्वी टेस्ट करावी- नव्या स्क्रबचा उपयोग करण्यापूर्वी एक छोटासा उपचार करून पहावा आणि पहा की त्वचा संवेदनशील आहे का? 
 
5. स्क्रबला जास्त वेळ ठेवू नये- स्क्रबला जास्त वेळ पर्यंत चेहऱ्याला लावून ठेवल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments