Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअर इंडिया झाली कर्जबाजारी कंपन्यांनी इंधन पुरवठा थांबवला

Webdunia
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (16:32 IST)
कर्जबाजारी झालेल्या एअर इंडिया सरकारी प्रवासी विमान कंपनीला मोठा धक्का इंधन कंपन्यांनी दिला आहे. थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांबवला आहे. तर दुसरीकडे इंधन पुरवठा थांबला म्हणून एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणावर कोणताही परिणाम नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 
 
एअर इंडियाचे प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, कंपनीला आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया मोठ्या प्रमाणावरील कर्जाचे उत्तरदायित्व हाताळू शकणार नाही. तरीही सध्या आशादायी चित्र असे आहे की, या अर्थिक वर्षातील आमची आर्थिक कामगिरी चांगली झाली असून, कंपनी सध्या तरी फायद्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
 
दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विविध राज्यांतील तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवरील एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा करणे बंद केले आहे. यामध्ये कोचीन, विशाखापट्टणम, मोहाली, रांची, पुणे या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.
 
एअर इंडियावर ४८,००० कोटींचे कर्ज असून, मागील वर्षी सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के भाग-भांडवल निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला, मात्र, ही भाग-भांडवल विक्री प्रक्रिया अपयशी ठरली आहे. सध्या जेट एअरवेजची उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत, त्यामुळे  एअर इंडिया ही देशात एकमेव विमान कंपनी आहे जी अमेरिका, युरोपसारख्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा देत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

तंत्रज्ञानाच्या या चमत्काराने महिलेने पहिल्या AI मुलाला जन्म दिला

एकदिवसीय सामन्यात दोन चेंडू वापरण्याच्या नियमात आयसीसी बदल करू शकते

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच CSK सलग पाच सामने गमावले, KKR तिसऱ्या स्थानावर

डोनाल्ड ट्रम्प यांची शारीरिक तपासणी झाली, प्रकृती चांगली असल्याचे म्हणाले

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

पुढील लेख
Show comments