Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! सोन्याच्या दरात घसरण

Webdunia
सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (20:11 IST)
सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे, या काळात सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे, तर चांदीचे दर स्थिर आहेत. गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज 20 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,640 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी घसरून 56,500 रुपयांवर आला आहे.
 
सोन्याच्या दरात किंचित घसरण
मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू  येथे 61,640 रुपये आहे. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 61,790 रुपये आहे, सोमवारी हे दर 61,840 रुपये होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 62,230 रुपये आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून दर स्थिर आहेत. आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 76,000 रुपये आहे.
 
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)
 
मुंबई - मुंबईत सोने 50 रुपयांनी स्वस्त होऊन 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
दिल्ली - 50 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.
कोलकाता - सोने 50 रुपयांनी स्वस्त होऊन 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चेन्नई - सोने 50 रुपयांनी महागलं असून 62230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
 
 पुणे - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त
नाशिक - 61690 रुपये 30 रुपयांनी स्वस्त
नागपूर - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त
कोल्हापूर - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त
 
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

वक्फ सुधारणा कायद्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय 15 एप्रिल रोजी याचिकांवर सुनावणी करू शकते

वर्ध्यात भाजपच्या माजी खासदाराला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

LIVE: वर्धा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात

देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

KKR vs LSG: लखनौचा आयपीएलमध्ये थोड्या फरकाने तिसरा विजय,केकेआरचा तिसरा पराभव

पुढील लेख
Show comments