Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लिपकार्टचे Big Saving Days sale 6 ऑगस्टपासून

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (08:55 IST)
फ्लिपकार्टने आपल्या Big Saving Days sale ची घोषणा केली आहे. 6 ऑगस्टपासून या सेलला सुरूवात होईल. पाच दिवसांच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स व डील्स मिळतील. फ्लिपकार्टने या सेलसाठी Citibank आणि ICICI Bank यांच्यासोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
 
या सेलमध्ये iPhone XR, Oppo Reno 2F, iPhone SE आणि Redmi K20 Pro यांसारख्या फोनवर डिस्काउंट मिळेल. याशिवाय Motorola Razr foldable फोनवरही 20,000 रुपयांची सवलत आहे. iPhone XR हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आठ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनच्या खरेदीवर कंपनीकडून एक्स्चेंज ऑफर व काही बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरही डिस्काउंटची ऑफर असेल. तर, 23 हजार 490 रुपयांचा Oppo Reno 2F स्मार्टफोन सेलमध्ये 17,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जवळपास 5,500 रुपये डिस्काउंट ग्राहकांना मिळेल.
 
याशिवाय, 42,500 रुपयांचा iPhone SE 2020 स्मार्टफोन 36 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तसेच, Redmi K20 Pro या स्मार्टफोनच्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत सेलमध्ये 26,999 रुपयांऐवजी 22,999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये रेडमी के20 प्रो स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची बचत होईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 1 लाख 24 हजार 999 रुपये किंमत असलेल्या Motorola Razr (2019) स्मार्टफोनवरही ग्राहकांची 20,000 रुपये बचत होऊ शकते. याव्यतिरिक्त Oppo Reno 10X Zoom, iPhone 7 Plus, आणि iQOO 3 या स्मार्टफोनवरही सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments