Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रियल एस्टेट क्षेत्रासाठी गुढीपाडवा नाही आणणार कोणताही हर्षनाद

Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2020 (19:39 IST)
पारंपारिकपणे, गुढी पाडव्याचा दिवस हा मोठ्या किंमतीच्या खरेदीसाठी एक शुभ दिवस मानला जातो कारण तेव्हापासून महाराष्ट्रमध्ये नवीन वर्षाची सुरूवात होते. हा प्रसंग साजरा करण्यासाठी लोक बहुतेकदा सोन्यासारख्या पारंपारिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात किंवा एखादी नवीन कार किंवा घर विकत घेतात, ही एक समृद्ध सुरुवात दर्शविणारी चाल आहे. या भावनांच्या परिणामी, अनेक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्या देखील नवीन प्रकल्पांची घोषणा करतात किंवा खरेदीदारांना आकर्षक ऑफर देतात. तथापि, शेअर बाजारामध्ये सतत होणारी अस्थिरता, कमकुवत आर्थिक मॅक्रो निर्देशक आणि कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबद्दल चिंतेमुळे, निवासी रिअल इस्टेट क्षेत्रातील नवीन लॉन्च मंद राहण्याची शक्यता आहे.
 
कोविड -१९ च्या उद्रेकास आळा घालण्यासाठी मोठ्या संमेलनावर बंदी तसेच सोशिअल डिस्टनसिंग यासारख्या खबरदारी घेण्याची तयारी सरकार करीत असताना, आम्ही विकासशील प्रकल्पांमध्ये फूटफॉल आणि कस्टमर विझिट कमी होण्याची अपेक्षा करत आहोत- ग्राहकांच्या मागणीचे विक्री मध्ये रूपांतर करणारे एक महत्त्वपूर्ण घटक. 
 
रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या काही काळापासून क्रेडिट आणि लिक्विडिटी क्रंचची आव्हाने झेलत आहे, विशेषत: मागणी कमी होत असताना. विक्रीच्या पारंपारिक काळाने मागील काही वर्षांत वापरकर्त्याच्या मागणी प्राप्त करण्यात अयशस्वी ठरली ज्यामुळे खंड ठप्प झाला आहे. सरकार रिअल इस्टेटचा अजेंडा पुढे नेत आहे पण प्रामुख्याने ते “परवडणाऱ्या घरांच्या” प्रति असून सवलत या खंडापुरतेच मर्यादित आहेत. याने मोठ्या प्रमाणात मध्यम व हाय-एन्ड प्रकल्पांना असहाय्य स्थितीत सोडून दिले आहेत.
 
India Residential Market

Parameter

2019

Change (YoY)

Launches (housing units)

2,23,325

23%

Sales (housing units)

2,45,861

1%

Unsold inventory (housing units)

4,45,836

-5%

Quarters to sell

8.9

-

Age of unsold inventory (in quarters)

15.9

-

 
Source: Knight Frank Research
 
नाईट फ्रॅंक ने २०१९ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत निवासी लॉन्चमध्ये २३% ची वाढ झाल्याचा अंदाज नोंदवला तर विक्री मध्यम प्रमाणात १ टक्क्यांनी वाढली. ही संख्या आव्हानात्मक दिसत नसली तरी लक्षात घेण्यायोग्य मुख्य बाब म्हणजे बहुतांश लॉन्च व विक्री ही सब ५० लाखांच्या श्रेणीत राहिले आहेत.
 
मुंबई आणि पुण्याच्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये हे चित्र विशेषतः भीषण ठरले आहे. २०१९ मध्ये, दोन्ही शहरांमध्ये नवीन लॉन्च वाढले तर विक्रीचा वेग खूप कमी राहिला. २०१९ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत मुंबईतील लॉन्च ७ टक्क्यांनी वाढली तर विक्री ५ टक्क्यांनी घटली. २०१९ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत शहराने सरासरी किंमतींमध्ये २ टक्क्यांची घट पाहिली असली तरी मागणी थंड राहिली. पुण्यामध्ये ही कथा काही फार वेगळे नव्हती जिथे २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मागणीत २ टक्क्यांनी घट झाली असतानाही नवीन लॉन्च ३७ टक्क्यांनी वाढले. २०१९ मध्ये पुण्यात न विकली गेलेली घरांची संख्या जवळपास ४०,००० युनिटपर्यंत पोहोचली. तर मुंबईत विक्री न झालेल्या घरांची संख्या अंदाजे १४५,३०० युनिट इतकी होती.
 
Residential Market in 2019 (YoY Change)

City

Launches (housing units)

Sales (housing units)

Unsold inventory (housing units)

Mumbai Metropolitan Region (MMR)

7%

-5%

15%

Pune

37%

-2%

43%

 
 
Source: Knight Frank Research
 
निवासी क्षेत्र मागणी वाढविण्यासाठी प्रोत्साहन शोधत आहे. तथापि, कोविड -१९ च्या उद्रेकांच्या दीर्घायुष्याबद्दलची सध्याची अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचा निश्चितपणे क्षेत्राच्या आरोग्यावर परिणाम होईल. बरेच विकासक त्यांचे नियोजित नवीन लॉन्च थांबवून ठेवतील तर मागणी नरम राहील. 
 
रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी अंतिम-वापरकर्ते या संधीचा विचार करू शकतात कारण घटक अनुकूल आहेत. २०१६ पासून रिअल इस्टेटच्या किंमती जवळपास १४ टक्क्यांनी सुधारल्या आहेत, गृह कर्जाचे दर कमी झाले आहेत आणि सुधारित नियामक मानदंड आणि रेरामुळे अंतिम-वापरकर्त्यांचे हित संरक्षित आहे. आगामी उत्सवाचा हंगाम नीरस राहण्याची शक्यता असताना, लोक त्यांच्या रिअल इस्टेटसाठी सर्वोत्तम मूल्य मिळवू शकतात याची खात्री करण्यासाठी खरेदी करण्याचा विचार करू शकतात. 
 
Written By- गिरीश शहा, कार्यकारी संचालक-निवासी विक्री, नाइट फ्रँक इंडिया

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

या महिलांना मिळणार नाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ! सरकारच्या नवीन अटी जाणून घ्या

मुंबईतील मानखुर्द येथे एका गोदामाला भीषण आग

चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले राहुल गांधी परभणीत नाटक करायला आले होते

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

Show comments