Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात करदात्यांची संख्या वाढली

income tax
Webdunia
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018 (08:22 IST)
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ वर्षात ६० टक्क्यांनी वाढून ती १.४० लाख इतकी झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे. 
 
सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात थेट कराचे जीडीपीमधील प्रमाण ५.९८ टक्के इतके आहे. हे प्रमाण गेल्या १० वर्षातील सर्वात चांगले आहे. गेल्या चार वर्षात जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे. ही संख्या २०१३-१४मध्ये ३.७९ कोटीवरून २०१७-१८मध्ये ६.८५ कोटी झाली आहे. 
 
त्याच बरोबर एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या वैयक्तीक करदात्यांच्या संख्येत ६८ टक्के वाढ झाली आहे. या एक कोटीमध्ये कॉर्पोरेट, फर्म, हिंदू अविभाजित कुटुंब व अन्य लोकांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षात कायद्यात झालेल्या सुधारणा, इनकम टॅक्स विभागाकडून करण्यात आलेले विविध प्रयत्न यामुळे कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चंद्रा यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडले

माणुसकीला काळिमा, पैशांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने महिलेचा जीव घेतला, शिवसेनेचा रुग्णालयाच्या बाहेर निदर्शन

नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडले,आरोग्य विभाग रुग्णालयावरील आरोपांची चौकशी करणार, विरोधकांचा हल्लाबोल

नागपुरात मानकापूर येथे गोळीबारात एकाची हत्या, एक जखमी, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments