Marathi Biodata Maker

आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले

Webdunia
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (14:03 IST)
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याला अपडेट केल्या जातात. या महिन्याच्या पहिल्या म्हणजे नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी 18 किलो गॅस सिलिंडरची किंमत 103 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
 
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर आहे. चला, आज तुमच्या शहरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
 
कोणत्या शहरात दर किती आहे?
किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत पुढीलप्रमाणे आहे.
 
दिल्ली रु. 1755.50
मुंबई रु. 1728
चेन्नई रु. 1942
कोलकाता  रु. 1885.50
 
पंधरा दिवसांपूर्वीच भाव वाढले होते
1 नोव्हेंबर रोजी सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली होती. त्याआधी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत 1731.50 रुपये, कोलकात्यात 1839.50 रुपये, मुंबईत 1684 रुपये आणि चेन्नईमध्ये 1898 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments