अ र्थसंकल्पापूर्वी मारुती कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे मारुती कंपनीच्या कार १७ हजार रुपयांपर्यंत महागल्या आहेत. नव्या किंमती लागूही करण्यात आल्या आहेत. मारुती कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर १७०० रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. अॅडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, रॉ मटेरियल आणि वितरण खर्चात वाढ झाल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मारुती कंपनीने गेल्या महिन्यात इयर इंड सेल दरम्यान ग्राहकांना कल्पना दिली होती की, नव्या वर्षात कारच्या किंमतीत वाढ होऊ शकते.