Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाईन फसवणूक, गृहणीला चक्क ३८ हजार रुपयांचा भुर्दंड

Webdunia
शनिवार, 12 जानेवारी 2019 (10:32 IST)
मुंबईतील वरळीच्या कोळीवाड्यात राहणार्‍या ममता उमानाथ शेट्टी एका ऑनलाईन साईटवरून खरेदी केलेली साडी आवडली नाही म्हणून ती परत करण्यासाठी गृहणीला चक्क ३८ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला 
 
ममता यांनी काही आठवड्यांपूर्वी एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून दीड हजार रुपये किमतीची साडी विकत घेतली होती. कंपनीने ममता यांना साडी घरपोच पाठवली. ममता यांनी साडीचे पैसे रोख दिले. मात्र, त्यांनी साडीचे पार्सल उघडून बघितले असता त्यांना साडी न आवडल्यामुळे त्यांनी ती परत करण्यासाठी ‘गुगल’वर ज्या ऑनलाईनवरून साडी मागवली त्यांचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर फोन केला व खरेदी केलेली साडी पसंत नसल्याने साडी परत करून पैसे परत मागितले. कस्टमर केअरमधून बोलणार्‍या व्यक्तीने ममता यांच्याकडे त्यांचा एटीएम कार्डच्या शेवटी असणार्‍या सहा डिजिटची माहिती मागितली. प्रथम ममता यांनी माहिती देण्यास नकार दिला असता तुम्ही माहिती दिली नाही तर आम्ही तुमचे पैसे कसे परत करणार, असे सांगून ममता यांच्या कार्डची माहिती आणि बँक खाते क्रमांक घेतला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यातून चार वेळा वेगवेगळी रक्कम असे एकूण ३७ हजार ९९९ रुपये काढल्याचे मेसेज ममता यांच्या मोबाईल फोनवर आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

20 कोटी रुपये खर्चून सिंधुदुर्गात शिवरायांचा 60 फूट उंचीचा भव्य पुतळा बसवणार

बदलापूर एन्काऊंटरवर मुंबई हायकोर्टाने उपस्थित केले प्रश्न, म्हणाले- प्रकरण चुकीचे आहे

लिपस्टिक लावल्यामुळे मेयरने लेडी मार्शलला ऑफिसतून हटवले

पुण्यात सासरच्या लोकांनी घरीच गर्भपात केला, ना आई वाचली ना बाळ

जागावाटपाचा निर्णय लवकरच' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

पुढील लेख
Show comments