बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जमा करण्याची सूचना दिली आहे. आता जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास तुमचे बॅक खाते बॅकेकडून गोठवण्यात येईल. बँक खाती पँनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत आता वाढ करून 30 जूनपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही, अशांनी फॉर्म-60 जमा करावा असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.