Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीएसई 3934 अंक आणि निफ्टी 1110 पॉइंटनी कोसळला

Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2020 (09:47 IST)
कोरोना व्हायरसचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर स्पष्ट दिसत आहे. वेगाने कोसळण्यासोबतच सुरू झालेल्या बाजारात सुरुवातीच्या अर्ध्या तासात लोअर सर्किट लावावा लागला. परंतू, 45 मिनीटानंतर बाजारात ट्रेडिंग परत सुरू झाल्यानंतर ट्रेडींग कोसळली. अखेरपर्यंत सेंसेक्स 3934.72 अंकांनी कोसळून 25,981.24 वर आणि निफ्टी 1,110.85 पॉइंट कोसळून 7,634.60 वर बंद झाला. ही सेंसेक्सच्या इतिहासातील सर्वात मोठी घट आहे. यापूर्वी 13 मार्चलाही बाजारात 3389 पॉइंटची घट झाली होती. 12 मार्चला बाजार 3204 अंकांनी कोसलला होता. मार्च महीन्यात सेंसेक्स आतापर्यंत 12,316 अंकांनी कोसळला आहे. महीन्यात बाजार आतापर्यंत 31 टक्के कोसळला आहे.
बाजार कोसळण्याची 3 कारणे
 
1. कोरोना व्हायरसते संक्रमण पसरल्यामुळे देशातील अनेक राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन करण्यात आले.
 
2. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत, दोन आठवड्यात 50,000 कोटी रुपये शेअर्स विकले.
 
3. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगभरातील बाजार कोसळत आहेत, हॉन्गकॉन्गच्या बाजारात 5% घट झाली आहे.
 
सेन्सेक्स : आतापर्यंत पाच वेळ लोअर सर्किट लागले, १९९० मध्ये झाला होता वापर
 
> २१ डिसेंबर १९९० : सेन्सेक्समध्ये १६.१९% ची घसरण नोंदली होती. घसरणीनंतर शेअर बाजार १०३४.९६ च्या पातळीवर पोहोचला होता.
 
> २८ एप्रिल १९९२ : तेव्हा सेन्सेक्समध्ये १२.७७%ची घसरण नाेंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ३८९६.९०च्या पातळीवर बंद झाला होता.
 
> १७ मे २००४ : शेअर बाजारात ११.१४% ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ४५०५.१६ च्या पातळीवर बंद झाला होता.
 
> २४ ऑक्टोबर २००८ : सेन्सेक्समध्ये १०.९६%ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ८७०१.०७ च्या पातळीवर बंद झाला होता.
 
> १३ मार्च २०२० : सेन्सेक्स ११% कोसळला, यानंतर लोअर सर्किट लागले. यानंतर बाजार ४५ मिनिटांपर्यंत बंद करावा लागला.
 
>सेंसेक्समध्ये 10 दिवसात दुसऱ्यांदा लोअर सर्किट लागला
 
सोमवारी सुरुवातीच्या एका तासात सेंसेक्स 10% नी कोसळला, यामुले लोअर सर्किट लिमिट लागू झाला आणि 45 मिनीटांसाठी ट्रेडिंग थांबली. थोड्यावेळाने बाजार पुन्हा सुरू झाला, पण घट थांबली नाही. यापूर्वी 13 मार्चलाही लोअर सर्किट लागला होता, पण बाजार परत सुरू झाल्याने रिकवरी झाली आणि वाढण्यासोबत बंद झाला होता.
 
>बीएसईवर 550 शेअर्समध्ये लोअर सर्किट
 
सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1953 शेअर्समध्ये घट झाली. फक्त 203 शेयर्समध्ये वाढ झाली, तर 122 शेयर्सच्या भावात कोणताच बदल झाला नाही. 550 शेयर्समध्ये लोअर सर्किट लागल्यामुळे त्या कंपन्यांची ट्रेडिंग थांबव्यात आली 51 कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटमुळे ट्रेडिंग थांबवावी लागली.
 
>घट थांबवण्यासाठी सरकार आणि सेबीचे उपाय कामी आले नाही
 
शेअर बाजाराची रेग्युलेटर सेबीने मागच्या आठवड्यात शॉर्ट सेलिंगच्या नियमांना कडक केले. यामुळे घट कमी होईल अशी आशा केली जात होती. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक बाबींवरील सुस्ती पाहता सरकारनेदेखील मोबाइल फोन आणि फार्म इंडस्ट्रीसाठी चांगली घोषणा केली, बाजारावर काहीच परिणाम झाला नाही. परेदशी गुंतवणूकदार सतत आपले पैसे काढून घेत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments