Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टी-शर्ट, टोप्या, पेनची 'नमो अ‍ॅप'वरून विक्री सुरू

Webdunia
बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (12:52 IST)
लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असताना राजकीय पक्षांनी आपापले 'डावपेच' आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल मीडियाचा आधार घेत मोदी यांच्या खासगी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन 'नमो अ‍ॅप'वरुन एक नवीन मोहीम सुरू केली आहे. 
 
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नमो  अ‍ॅपवरून आता टी-शर्ट, टोप्या, वह्या आणि पेनची विक्री सुरू करण्यात आली आहे. या उत्पादनावर नमो अगेन, नमो नाम, इंडिया मोडिफाईड, यासारखे घोषवाक्य लिहिले आहेत. नमो टी-शर्ट, नमो नोटबुक, स्टिकर, मॅग्नेट आणि मग यांची किंत 99 रुपयांपासून 299 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मोदी यांचा ऑफिशियल नमो अ‍ॅप हा देशभरात खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत जवळपास 5 मिलियन लोकांनी तो डाउनलोड केलेला आहे.
 
नमो अ‍ॅपवरुन सामान खरेदी करणार्‍या ग्राहकांना ब्रँड क्वालिटी, योग्य भावात उत्पादने मिळावीत हा त्यामागचा हेतू आहे. या उत्पादन विक्रीतून जो पैसा मिळेल तो गंगा स्वच्छतेसाठी वापरला जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिली. भाजपच्या या नमो अ‍ॅपनंतर काँग्रेसही निवडणुकीच्या तोंडावर यासारखाच एक अ‍ॅप लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments