Marathi Biodata Maker

Planet Marathi : Baap Beep Baap : वडील मुलाचे नाते बहरण्यासाठी 'वय नाही'

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (16:34 IST)
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' या वेबसीरिजमधील वडील - मुलाच्या नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या वेबसीरिजमधील 'वय नाही' हे धमाल गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.  
 
'बाप बीप बाप'मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळताना, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे, असे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.
 
'वय नाही'या गाण्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हे एक धमाल गाणे असून वडील -मुलाच्या नात्याला एक नवे वळण देणारे हे गाणे आहे. वडील - मुलाच्या नात्यात नाही म्हटले तरी एक दरी असते. ही दरी मिटवून हे नाते अधिक घट्ट करण्याचा आणि या अबोल नात्यावर भाष्य करणारे 'वय नाही' हे गाणे आहे. प्रत्येक पाल्य -पालकाने पाहावी अशी ही वेबसीरिज आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

अर्जुन रामपालच्या माजी पत्नीने बिपाशा बसूला मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्यास मदत केली

गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर पुणेरी काकांच्या प्रतिक्रिया .....

करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने थलापती विजयला नोटीस बजावली

Tourist Cities in Maharashtra : महाराष्ट्रातील मोठी शहरे आणि त्यांची मुख्य आकर्षणे

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

पुढील लेख
Show comments