Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BALOCH-मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' 5 मे रोजी होणार प्रदर्शित

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (21:13 IST)
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत.

आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची.  पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पंतप्रधान मोदी पाहतील विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट

विक्रांत मॅसी यांनी अभिनयक्षेत्रातून घेतली निवृत्ती, वयाच्या 37 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

पुढील लेख
Show comments