rashifal-2026

माय-लेकीच्या नात्यातला 'बोगदा' लवकरच

Webdunia
सोमवार, 16 जुलै 2018 (14:02 IST)
नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.
 
'बोगदा' या सिनेमाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्रीव्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ' स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे'. इतकेच नव्हे तर, आशयसमृद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या 'बोगदा' सिनेमाला 'व्हीस्लिंग वूड'च्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.
 
सिनेमाची दिग्दर्शिका स्वतः भारतातील या अग्रेसर फिल्म इंस्टीट्युटची विद्यार्थिनी असून, छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पंगारे, वेशभूषाकार यश्मिता बाने हे पडद्यामागील कलाकारदेखील व्हीस्लिंग वूडचेच असल्याकारणामुळे, 'बोगदा' हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा नमुनाच ठरणार आहे. या सिनेमाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून, सुरेश पान्मंद, नंदा पान्मंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून 'बोगदा' सिनेमाची निर्मिती केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

बिग बॉस मराठी' सीझन 6 चा प्रोमो रिलीज, होस्ट रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने जिंकले मन

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

पुढील लेख
Show comments