Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

७ डिसेंबर बसणार 'फ्री हिट दणका'

Webdunia
शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (16:05 IST)
भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला असून यात 'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे. ग्रामीण कथेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. 
 
उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील नेत्यांमधील वैमनस्यातून क्रिकेटच्या मॅचचे आयोजन केले जाते. या मॅचचा विजेता नक्की कोण ठरतो? या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायकाच्या प्रेमाचा बळी जातो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यामुळे अधिकच वाढली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात अपूर्वा एस. हिच्यासह 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख
Show comments