Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (15:19 IST)
भारतातून काळ्या पाश्याचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर संपूर्ण देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ५०० आणि १००० रु.च्या नोटाबंदीचे पडसाद देशातील सर्व क्षेत्रामध्ये पडले आहे. त्यामुळे पर्यायी नोटा उपलब्ध करून त्याचे समान वाटप करण्याची मोठी जबाबदारी आज भारतातील
प्रत्येक बँकेवर आली आहे. दैनंदिन खर्चासाठी अत्यंत आवश्यक असलेले पैसे बदलून देण्यासाठी बँकेचे कर्मचारी जादावेळ काम करताना दिसून येत आहेत. बँकेबाहेर तासंतास उभे असलेल्या नागरिकांचा रोष पत्करत, बँकेचे व्यवहार चोख करताना ते दिसत आहेत. 
 
चलन बदलाची ही मोठी जबाबदारी लीलया पेलत असलेल्या बँकेतील कर्मचा-यांचे सध्याचे भावविश्व  स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ या मालिकेद्वारे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. देशातील आर्थिक व्यवस्थेला परिणाम करणाऱ्या या नोटाबंदीला सर्वच बँकांना उत्तम प्रतिसाद दिला आहे; स्टार प्रवाहची मंजुळाबाई उसने परतफेड बँकदेखील त्याला अपवाद नाही. आपल्या कौटुंबिक समस्या बाजूला ठेवत या सहाजणी नागरिकांच्या सेवेसाठी अधिकतास बँकेत काम करणार आहेत. वास्तवातदेखील सर्वत्र हेच चित्र दिसून येत आहे. आपले खाजगी आयुष्य बाजूला ठेवत बँकेतील सर्व कर्मचारी बँकेत येणाऱ्या नागरिकांच्या गरजा पुरवत आहेत.  
‘ग सहाजणी’च्या या विशेष भागात एक रंजक घटना देखील रसिकांना पाहायला मिळणार आहे. बँकेच्या कामात भरपूर व्यस्त असलेल्या कामिनीच्या मुलीवर एक समस्या ओढावली आहे, मात्र कामिनीला तिच्याकडे जाता येत नाही. कामाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे तिला तसे करणे शक्य होत नाही. शिवाय आपल्या स्टाफना सांभाळून घेणाऱ्या ब्रांच मॅनेजर विद्या विसपुते मॅडम यांदेखील गैरहजर असल्यामुळे बँकेचा सारा कारभार धबडगावकरांकडे आला आहे. अशावेळी कामिनी काय करते? पाचजणी तिला कशी मदत करतात? धबडगावकर सहा जणींच्या बाजूने उभे राहतील का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 
 
देशातील आर्थिक उलाढालीला कारणीभूत असलेल्या या चलनबदलामुळे कामाच्या पेचात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे जीवन आणि त्यांची कर्तव्यदक्षता दाखवणारा ‘ग सहाजणी’ चा हा एपिसोड दि. २२ आणि २३ नोव्हेंबरला प्रेक्षकांना पाहता येईल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments