Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'लव्ह यू जिंदगी' चित्रपटाचा टीझर

Webdunia
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (11:23 IST)
तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणार्‍या अनिरुद्ध दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यू जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अद्‌भुत भेट मिळाली आहे. हटके विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट असून एक वेगळा प्रवास या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवायाला मिळणार आहे. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला ळिणार आहे. 'लव्ह यू जिंदगी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर हे लक्षात येते की, सचिन पिळगांवकर साकारत असलेल्या अनिरुद्ध दाते या व्यक्तिरेखेचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की, ते त्यांच्या 
वाढत्या वयाच्या सत्याला स्वीकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला ळिणार आहे. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केजीएफ 2'ला मागे टाकत 'छावा' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अभिनेता सुनील शेट्टीचा जेव्हा... अमेरिका पोलिसांनी केला अपमान, अजूनही स्मरणात आहे

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

घटस्फोटाच्या बातमीवर गोविंदा आणि सुनीताच्या भाचीने दिली प्रतिक्रिया

दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण

सर्व पहा

नवीन

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

International Women's Day 2025: महिलांना या पर्यटनस्थळी आहे विशेष सूट

जान्हवी कपूरसोबत चाहत्याने गैरवर्तन केले, युजर्स संतापले

भस्म होळी वाराणसी, जिथे रंगांऐवजी चितेच्या राखेने होळी खेळली जाते

पुढील लेख
Show comments