Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MANN KASTURI RE : त्या रात्री नेमक काय झालं? 'मन कस्तुरी रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:50 IST)
एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’गाण्याचे  जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 
 
सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाची काही स्वप्ने असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच् चेहऱ्यावरील हास्य. असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. कॅालेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे.  त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 
 
संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. नितीन केणी यांनी यापूर्वी ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.

Yogita Raut 
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख
Show comments