Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Webdunia
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (11:48 IST)
सैराट, फ्रँडी, नाळ या सारखे यशस्वी चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या मनात आपले घर करणारे नागराज मंजुळे पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. यांच्या सैराट चित्रपटाने प्रचंड यश संपादित करून आपल्या प्रेक्षकांचे मन जिंकले होते. सैराटला प्रेक्षकांकडून भरभरून यश मिळाले होते. सैराट मध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे मुख्य भूमिकेत होते. या दोघांना देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते. आता नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ निर्मित चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'घर बंदूक बिरयानी' नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत तावडे यांनी लिहिलेले असून चित्रपटाला  ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे.येत्या पुढील वर्षी हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर ,नागराज मंजूर, आणि  सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.आकाश ठोसर यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे घर बंदूक बिरयानी चांगभलं म्हणत पोस्टर टाकले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?

माझ्या जीवाला धोका असू शकतो...', त्याचे बनावट एक्स अकाउंट पाहून सोनू निगम संतापला

रंगीला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरने मोठ्या पडद्यावर राज्य केले

ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

सर्व पहा

नवीन

Valentine's Day Special देशातील या रोमँटिक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे करा साजरा

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

श्रीदत्तगुरू भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

छत्रपती संभाजी महाराजांना 'छावा' हे नाव कसे पडले? जाणून घ्या ती रंजक कहाणी

पुढील लेख
Show comments