Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'उत्तुंग भरारी'साठी पुन्हा सज्ज

Webdunia
गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (16:33 IST)
प्रेक्षकांची नाळ अचूक ओळखून, त्यांना पठडीबाहेरचे चित्रपट देणाऱ्या निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूरने 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन'च्या माध्यमातून 'बालक पालक' 'यल्लो',यांसारखे संवेदनशील विषय असलेले चित्रपट बनवले तर 'डोक्याला शॉट'सारखा एक भन्नाट विनोदी चित्रपटही मराठी सिनेसृष्टीला दिला. यातील 'यल्लो' चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. असे आशयपूर्ण, मनोरंजनात्मक विषय हाताळल्यानंतर आता उत्तुंग ठाकूर लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात या चित्रपटाबाबतीतील सगळ्या गोष्टी अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत.
 
सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या उत्तुंगने परदेशातून चित्रपट निर्मितीचे धडे घेतले आणि त्याचा उपयोग त्याने भारतात येऊन केला. मुळात उत्तुंगला संहितेची उत्तम जाण असल्याने त्याच्या चित्रपटाची निवड अचूक ठरते. चौकटीमध्ये बंदिस्त न राहता काहीतरी नवीन देण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो. उत्तुंगचे वैशिष्ट्य म्हणजे एखादया चित्रपटासाठी त्याचे केवळ आर्थिक पाठबळच नसते, तर त्या चित्रपटाच्या सर्जनशीलतेसाठीही तो तितकाच आग्रही असतो. चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याचा वैयक्तिक सहभाग असतो. त्यामुळे उत्तुंगच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला एक जाणता निर्माता मिळाला आहे. एक निर्माता म्हणून तर त्याने 'उत्तुंग भरारी' घेतली आहेच याशिवाय 'डोक्याला शॉट' या चित्रपटातील एका गाण्यात त्याने आपले अभिनयकौशल्यही दाखवले आहे. त्यामुळे येत्या काळात आता उत्तुंग प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, हे सगळ्यांसाठीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

Athiya Shetty: केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच होणार आई बाबा

सलमान खानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी, म्हणाला- गाणे लिहिणाऱ्याला मारून टाकू, हिंमत असेल तर स्वत:ला वाचवा

क्राईम पेट्रोल अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या

२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

पुढील लेख
Show comments