Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेत निर्मित पहिला मराठी चित्रपट 9 जुलै रोजी कोल्हापूर येथे प्रदर्शित होणार

Webdunia
गुरूवार, 7 जुलै 2022 (07:59 IST)
कोल्हापुरातील आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे वास्तव्य असलेल्या गौतम दिलीप पंगू यांनी आपला सांगलीचा मित्र आशय जावडेकर याच्या साथीने अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट निर्माण करून नवा इतिहास घडवला आहे. 2019 मध्ये बनलेल्या या ‘डी. एन. ए.’ नावाच्या चित्रपटाचे प्रदर्शन कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी शनिवार 9 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी गौतम पंगू हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
 
कोल्हापूर शहरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेच्या पिछाडीस असणाऱया पंगूवाडय़ात लहानाचा मोठा झालेला गौतम दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला होताच.  लहानपणापासून लेखनाचा छंद जपणाऱ्या गौतम पंगू यांनी संशोधन कार्यात नावलौकिक कमवत असतानाही विविध प्रकारचे मराठी लेखन करणे सुरू ठेवले आहे. विशेषतः परदेशात स्थलांतरित भारतीयांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू ते आपल्या लेखनातून सातत्याने हाताळत असतात.
 
महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतीलही विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ललित लेख, माहितीपर लेख आणि कथा सातत्याने प्रकाशित होत असतात. ‘स्टोरी टेल’ या ऑडिओ बुकसाठीदेखील त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत. गौतम व आशय जावडेकर यांची भेट झाल्यानंतर त्या दोघांनी ‘शँक्स’ हा लघुपट व ‘डी. एन. ए.’ हा चित्रपट यांच्या पटकथा परस्परसहकार्याने लिहिल्या आणि आशय जावडेकरांनी या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेषतः ‘डी. एन. ए.’ला परदेशातील विविध महोत्सवात चांगली दाद मिळाली आहे आणि आता हा चित्रपट फिल्म सोसायटीमुळे कोल्हापुरातील रसिकांनाही पाहता येणार आहे.
 
फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी ‘डी. एन. ए.’ या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पालकत्व म्हणजे डी. एन. ए. म्हणजेच केवळ गुणसूत्रे पुढच्या पिढीकडे केवळ संक्रमित करणे नव्हे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते

मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो

राजश्री प्रॉडक्शन स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

डिसेंबरमध्ये 20 हजार रुपयांच्या आत चांगल्या ठिकाणी भेट द्या, हे टूर पॅकेज बघा

Sexiest Man म्हणून निवडले गेले होते झाकीर हुसेन, अमिताभ बच्चनला मागे सोडले होते

पुढील लेख
Show comments