Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रानटी चित्रपटाचा दमदार टिझर आला !

Webdunia
शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (14:00 IST)
THE MOST POWERFUL MARATHI FILM OF THE DECADE…. अशी टॅगलाईन दिमाखाने मिरवणाऱ्या समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त  गुंफण पहायला मिळते आहे.

अभिनेता शरद  केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त 'रानटी' अंदाज यात दिसतोय. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी  अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. 
 
'अपून फूल ऑन डेंजर..  डोन्ट टेक मी लाइट' अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा असं एक ‘सुपर पॅकेज’ असलेला पॉवरफुल अॅक्शनपट ‘रानटी’ येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 
 
लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कड यांचे सर्व चित्रपट लक्षवेधी राहिले आहेत. ‘रानटी’ च्या निमित्ताने मराठीत भव्य अॅक्शनपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून अली आहे. ‘रानटी’चा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
 
 ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.
 
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले

देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?

ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

सर्व पहा

नवीन

रंगीला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरने मोठ्या पडद्यावर राज्य केले

सानंदच्या रंगमंचावर काही दिवसांतच 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी' हे नाटक होणार सादर

Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary: पंडित भीमसेन जोशी जयंती

माँ नर्मदेचे उगमस्थान अमरकंटक

Narmada Parikrama नर्मदा परिक्रमा नियम आणि महत्त्व, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments