Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Samrenu Title Song- 'समरेणू' चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित....

Webdunia
शनिवार, 9 एप्रिल 2022 (12:48 IST)
लोकप्रिय नेत्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते 'समरेणू' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम अधिकच खुलून येते, हे या गाण्यातून दिसून येत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. 
 
 'समरेणू'चे दिग्दर्शक, लेखक महेश डोंगरे म्हणतात, " हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे."
 
'समरेणू' हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. 'समरेणू' ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments