Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Asia Cup 2022 : हा फलंदाज रोहित शर्मा सोबत ओपनिंग करणार, अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11 जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (19:11 IST)
27 ऑगस्टपासून आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याचवेळी 28 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा शानदार सामना होणार आहे. म्हणजेच या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. 2022 आशिया कप UAE मध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारताचा15 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. आशिया कपमध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते जाणून घेऊया. 
 
आशिया चषक स्पर्धेत भारताची आघाडीची फळी केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली असेल. बऱ्याच दिवसांनंतर कोहली आणि राहुलचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहेत.
 
आशिया चषकात भारताची मधली फळीही मजबूत दिसत आहे. मध्यभागी, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जगातील क्रमांक दोनचे फलंदाज सूर्यकुमार यादव, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंत, बॅट आणि बॉलसह हार्दिक पंड्या आणि IPL 2022 चा सर्वोत्तम फिनिशर दिनेश कार्तिक असतील. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे संघाचे वेगवान गोलंदाज असतील. फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल हे फिरकी विभाग सांभाळू शकतील. 
 
2022 आशिया कपसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments