Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (10:18 IST)
T20 WC 2024 : आयसीसी T20 विश्वचषक 2024 सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. भारतीय वेळेनुसार 1 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. यासाठी सर्व संघ पूर्ण तयारीत आहेत. पाकिस्तानचा संघ वगळता इतर सर्व संघांनी आपली पथके जाहीर केली आहेत. भारतीय संघानेही यासाठी तयारी सुरू केली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा म्हणाला की, मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात.
 
रोहित शर्मा पाकिस्तानच्या चाहत्यांबद्दल काय म्हणाला
दुबईआय या वाहिनीवर बोलताना रोहित शर्माने हे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात. पाकिस्तानी चाहत्यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. त्याचं भारतीय क्रिकेटपटूंवरही खूप प्रेम आहे. जेव्हा आपण ब्रिटनमध्ये खेळायला जातो तेव्हा पाकिस्तानी चाहते येतात आणि सांगतात की त्यांना भारतीय क्रिकेटपटू किती आवडतात. पाकिस्तानी चाहत्यांकडूनही आम्हाला खूप प्रेम मिळते. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चर्चा होते, तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांची नजर त्याकडे असते. या दोन देशांमधील स्पर्धा सर्वाधिक हाय व्होल्टेजची मानली जाते. दोन्ही देशांचे चाहतेही त्यांच्या संघाला खूप सपोर्ट करतात.
 
भारत-पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे
ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. हा सामना अमेरिकेत होणार आहे. याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा नव्या कर्णधारासह खेळणार आहे. आयसीसी वनडे विश्वचषक 2023 नंतर बाबर आझमकडून शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते, मात्र आता टी-20 विश्वचषकापूर्वी पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध तर दुसरा सामना 9 मे रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळणार मोफत उपचार, राष्ट्रपतींची मोठी घोषणा

नवनीत राणांची असदुद्दीन ओवेसी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कारण जाणून घ्या

शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, रेट सांगा; षंढांना घाणेरडी मागणी केल्याने बिहार पोलिसांना मारहाण !

लोकलमधील प्रवाशांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट, मुंबई हायकोर्टाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री पदाला घेऊन महायुतिमध्ये वाद वाढला, अजित पवार सह्योगीने केला दावा, एमवीए ने देखील मांडला आपला मुद्दा

सर्व पहा

नवीन

इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघासमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं

IND vs ENG : ICC ने IND vs ENG सेमी फायनल मॅच संदर्भात मोठी घोषणा केली

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

पुढील लेख
Show comments