rashifal-2026

गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळून गेला षटकार

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (14:01 IST)
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते, मैदानावर काहीही होऊ शकते ज्यावर अनेकदा विश्र्वास ठेवणे कठीण असते. एखाद्या फलंदाजाने मारलेला फटका गोलंदाजाच्या डोक्यावर आदळून षटकार गेल्याचे तुम्ही कधीही पाहिले नसेल. पण असे घडले आहे, न्यूझीलंडध्ये एका क्रिकेटच सामन्यात.
 
न्यूझीलंडच्या स्थानिक एकदिवसीय सामन्यादरम्यान हा चमत्कारीक फटका पाहायला मिळाला. न्यूझीलंड संघाचा कसोटी सलामीवीर जीत रावल याने हा अफलातून शॉट मारला. येथील फॉर्ड ट्रॉफीतील एका सामन्यात ऑकलंडच्या संघाकडून खेळताना फलंदाज जीत रावल याने कॅन्टरबरी संघाचा गोलंदाज आणि कर्णधार अ‍ॅन्ड्र्यू एलिस याने टाकलेल्या एका चेंडूवर जोरदार प्रहार केला. 
 
आक्रमक खेळत असलेल्या जीत रावलने हा शॉट थेट गोलंदाजाच्या दिशेने मारला होता. शॉटचा वेग इतका जास्त होता की गोलंदाज एलिसने स्वतःच्या बचावासाठी खाली वाकण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात चेंडू एलिसच्या डोक्यावर बरोबर मधोमध येऊन आदळला आणि आश्चर्यकारकरीत्या उडून सीमारेषेपार गेला. पंचांनी पहिले चौकार असल्याचा इशारा केला पण लगेच बदलून षटकार असल्याचे स्पष्ट केले. 
 
पण विशेष म्हणजे इतक्या जोरात चेंडू लागल्यानंतरही गोलंदाज एलिसला काहीही झाले नाही. शॉट एलिसच्या डोक्यावर लागल्याचे पाहताच रावल त्याची विचारपूस करण्यास गेला पण तो ठणठणीत उभा होता. सुरक्षेच्या कारणास्तव एलिसला मैदानाबाहेर नेऊन त्याची वैधकीय चाचणी घेण्यात आली. सामना संपायला काही षटके शिल्लक असताना एलिस मैदानात परतला आणि विशेष म्हणजे त्याने रावलची विकेट देखील घेतली. 
 
रावलच्या 149 (153 चेंडू) धावांच्या खेळीध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्या शानदार फलंदाजीच्या बळावर ऑकलंडने हा सामना जिंकला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

ढाका संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीसीसीआयने अंडर-19विश्वचषक संघ जाहीर केला, आयुष कर्णधारपदी

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments