Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल : हैदराबाद प्ले ऑफमध्ये दाखल

Webdunia
शुक्रवार, 11 मे 2018 (08:37 IST)

यजमान दिल्लीचा ९ विकेट्सने दणदणीत पराभव करत हैदराबादने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आयपीएलच्या ११ सत्रात प्ले ऑफमध्ये दाखल होणारा हैदराबाद पहिला संघ ठरला आहे.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १८८ धावांचे आव्हान हैदराबादने सहज गाठले. कर्णधार विलियम्सन आणि सलामीवीर शिखर धवनने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. धवनने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारसह नाबाद ९२ धावा केल्या, तर कर्णधार विलियम्सने ५३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारसह नाबाद ८३ धावा केल्या.  त्याआधी युवा फलंदाज ऋषभ पंतने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने सनरायझर्स हैदराबाद समोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतने शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने ६३ चेंडूत नाबाद १२८ धावा केल्या. आयपीएलच्या या सीझनमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि जेसन रॉय झटपट परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही पंतशी योग्य समन्वय न साधल्याने ३ धावांवर रन आऊट झाला. पंतने त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. त्याने ५६ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह शतक झळकावले. पंतने ग्लेन मॅक्सवेल सोबत पाचव्या विकेट्ससाठी ६३ धावांची भागिदारी केली. भुवनेश्वरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आधी दोन  चौकार आणि नंतर सलग तीन षटकार खेचत त्याने २६ धावा केल्या. आयपीएलच्या या सीझनमधील हे तिसरे शतक आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments