Marathi Biodata Maker

हरभजन सिंहने केली चिमुरडीला मदत

Webdunia
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:13 IST)

फिरकीपटू हरभजन सिंहने एक ट्वीट पाहिल्यानंतर चार वर्षांच्या मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत केली आहे.

हरभजनने काही दिवसांपूर्वी खालसा एड नावाच्या ट्विटर हॅण्डलवर चार वर्षांच्या काव्याचा फोटो पाहिला. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयात दाखल असून तिला मेंदूचा आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी 4600 डॉलरच्या मदतीची गरज आहे, अशी माहिती या ट्वीटमध्ये दिली होती.

ट्वीट पाहिल्यानंतर हरभजनचं काळीज पिळवटलं आणि ट्वीटला रिप्लाय करुन मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. “मी कशाप्रकारे या मुलीची मदत करु शकतो, मला तिच्या उपचारांसाठी मदत करायची आहे. मला सगळी माहिती उपलब्ध करुन द्या,” असं ट्वीट हरभजनने केलं. 

मिळालेल्या माहितीच्या आधारावर भज्जीने दिल्लीतील रुग्णालयात जाऊन काव्याची भेट घेतली. तसंच तिला आर्थिक मदतही केली. यानंतर हरभजनने ट्वीट केलं की, “काव्या आमची मुलगी आहे. देव तिचं रक्षण करो. आम्ही फक्त आमचं काम करत आहोत.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

PBKS vs MI: आजचा सामना कोण जिंकणार? पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज धरमशाला स्टेडियमवर आमनेसामने येतील

RCB vs KKR: आरसीबीने केकेआरला ६ गडी राखून पराभूत केले, विराट कोहलीने शानदार शतक झळकावले

GT vs SRH: हैदराबादचा संघ ८६ धावांवर सर्वबाद, गुजरातने दणदणीत विजयासह अव्वल स्थान पटकावले

प्रीती झिंटाने सोशल मीडियावर जोरदार टीका केली; पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावले

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत नवे वळण: दोन फलंदाजांनी ५०० हून अधिक धावा केल्या, वैभव सूर्यवंशी शर्यतीतून बाहेर

पुढील लेख
Show comments