आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू झाली,अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजनसिंग याने ट्विट करून दिली.ट्विटमध्ये हरभजनने म्हटले आहे की, आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत.
मला आशा आहे की, वाहेगुरू सर्वांना सुरक्षित ठेवतील. आपण कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.
ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात १५०० नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल.या मदतीमुळे कोरोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये लोकांना मोफत चाचणी करता येईल, तर काही लोकांना ५०० रूपये खर्च येऊ शकतो.