Dharma Sangrah

मोहम्मद शमीने आरोप फेटाळले

Webdunia
बुधवार, 7 मार्च 2018 (16:46 IST)
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत. तिने  लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शमीने आरोप फेटाळले आहेत. 

या वादानंतर शमीने ट्विटरवर याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्या सर्वस्वी खोट्या आहेत. हा माझ्याविरोधातील मोठा कट आहे. मला बदनाम करणं आणि माझं खेळावरुन लक्ष हटवण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे”, असं शमीने म्हटलं आहे.  

तर शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी शमीवरील आरोप फेटाळले आहेत. “मोहम्मद शमी हा खूपच लाजरा आणि एकटा एकटा राहणारा मुलगा आहे. मुलींसोबतचे संबंध तर दूरचाच विषय आहे. मी त्याला जवळून ओळखतो. त्याच्या पत्नीने जी पोस्ट लिहिली आहे, तसा शमी अजिबात नाही. जर काही वाद होते, तर ते बंद दाराआड मिटवायला हवे होते. मला वाटत नाही, त्यांच्यात इतके टोकाचे वाद होते. शमी आफ्रिका दौऱ्यावर होता, त्यावेळी माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं. आता पुढे भेटेल तेव्हा बातचीत होईल. मात्र शमी त्यातला नाही हा माझा विश्वास आहे” असे म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

रिंकू सिंग टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला, वडिलांची प्रकृती गंभीर

कर्णधार हॅरी ब्रुकच्या शतकामुळे इंग्लंड पोहोचला उपांत्य फेरीत, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

फलंदाज रिंकू सिंग अचानक स्पर्धेच्या मध्यभागी मायदेशी परतला

T20 World Cup टी-२० विश्वचषकादरम्यान टीम इंडियाचा खेळाडू संघ सोडून गेला

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईत पोहोचली

पुढील लेख
Show comments