Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉल टॅम्परिंग प्रकरण : तीन खेळाडू दोषी

Webdunia
बुधवार, 28 मार्च 2018 (09:11 IST)
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली.  यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर तीनच खेळाडू यामध्ये दोषी आढळले आहेत. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होते. त्यानंतर स्मिथने  याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

पुढील लेख
Show comments