Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीएमसीने क्रिकेटपटूं युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांना ही दिली तिकिटे

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2024 (09:06 IST)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचे दोन माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे. युसूफ यांना तृणमूल काँग्रेसने बहरामपूरमधून, तर कीर्ती आझाद यांना वर्धमान दुर्गापूरमधून तिकीट दिले आहे.
 
युसूफ काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध लढणार आहेत. 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा युसूफ एक भाग होता, तर कीर्ती आझाद हा 1983 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.
 
युसूफपठाण हे  आणखी एक माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे  भाऊ आहे. ते  सात वर्षे आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळले  आहे. 2012आणि 2014 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाचा युसूफ सदस्य होते . आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांचा गौरव केला.
 
तृणमूल काँग्रेसने 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या कीर्ती आझाद यांनाही तिकीट दिले आहे. ते वर्धमान दुर्गापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. कीर्ती आझाद यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

कीर्ती आझाद यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते धनबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने लढवले होते, परंतु भाजपच्या पशुपती नाथ सिंह यांनी 4.8 लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला होता.

नोव्हेंबर 2021 मध्ये कीर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राजकारणातून निवृत्ती होईपर्यंत या पक्षासाठी काम करत राहीन असे त्यांनी सांगितले होते.  

युसूफने2007 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा T20 विश्वचषक सामना होता. त्याचवेळी त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. युसूफ शेवटचा 2019 मध्ये आयपीएलमध्ये दिसले होते.फेब्रुवारी 2021 मध्ये युसूफने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

आयपीएल 2025 मेगा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये आयोजित

ICC ची महिला क्रिकेटसाठी मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments