rashifal-2026

बीसीसीआयमध्ये सेटिंग नसल्यामुळे कोच झालो नाही – सेहवाग

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:08 IST)
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रशिक्षक निवडीवरून खळबळजनक वक्तव्य केले  आहे. बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा नसल्यामुळे आपल्याला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता आले नाही. या पदासाठी आता पुन्हा अर्ज करणार नसल्याचे सेहवागने म्हटले आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री आणि सेहवाग यांच्यात मुख्य टक्कर होती. मात्र रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. हा निर्णय क्रिकेट सल्लागार समितीलाही मान्य नव्हता. या समितीनेच प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. ”जे प्रशिक्षक निवडणारे होते त्यांच्याशी माझी सेटिंग नसल्यामुळे मी प्रशिक्षक होऊ शकलो नाही. अर्ज करत असतानाच बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी मन विचलित करण्याचा प्रयत्न केला,” असा दावा सेहवागने  एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने केला आहे
भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. मात्र बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी अर्ज करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि अर्ज केला, अशी माहितीही सेहवागने दिली. अर्ज करण्यापूर्वी विराट कोहलीचाही सल्ला घेतला होता. त्यानंतरच अर्ज करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणे ही माझी स्वतःची इच्छा नव्हती आणि यापुढेही कधी अर्ज करणार नाही, असेही सेहवागने स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

AUS vs ENG: सिडनीमध्ये पाचव्या अ‍ॅशेस कसोटीसाठी सुरक्षा कडक, गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

आयपीएलपूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का, साई सुदर्शनला दुखापत

पुढील लेख
Show comments