Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात कैदी बँडवाले

Webdunia
जयपुर कारागृहातील कैदी आणि चक्क लग्नाच्या वरातीत बँड वाजवतात असे ऐकले तर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. पण हे सत्य आहे. जोधपूर येथील कारागृहातील कैदी न केवळ लग्नात जातात पण येथे ते बँड वाजवून लोकांचे मनोरंजन देखील करतात. त्याच बरोबर हे काम पूर्ण झाल्यानंतर कैदी इमानदारीने कारागृहात परत जातात आणि कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम केवळ एकच हवालदार करतो.
जोधपूरमधील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बँड वाजवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कैद्यांना लग्न अथवा इतर समारंभांमध्ये बँड वाजवण्यासाठी पाठवण्यात येते. या बँड पथकात एकूण १२ वादक कैदी असतात. जेथे एक तास बँड वाजवण्यासाठी इतर वाजंत्री २० ते ३० हजार रुपये बिदागी घेतात. तेथे हे कैदी ताशी १६०१ रुपये ऐवढी बिदागी घेतात. 
 
दरम्यान कैद्यांचा हा बँड एवढा लोकप्रिय झाला आहे की या सीझनमध्ये आतापासूनच आगाऊ बुकिंग सुरु झाली आहे. मध्यवर्ती कारागृहात याची बुकिग करावी लागते. बुकिंग करतेवेळी सर्वप्रथम कार्यक्रमाची तारीख आणि वेळ सांगावी लागते आणि या कैद्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन जाणे आणि परत आणून पोहचविण्याचे काम कार्यक्रम आयोजकाची असते.
 
कारागृह प्रशासनाकडून या कैद्यांना बँड वाजविण्यासाठी विशिष्ट गणवेष दिला जातो. या बँडचे वैशिष्ट्य म्हणजे हा बँड राजस्थान उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमांमध्ये वाजविला जातो.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments