Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्थलांतरित पक्षी व जीव

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)
गुलाबी थंडी सुरू झाली की पाणथळ प्रदेश, झाडेझुडपे, जंगल असलेल्या भागात विविध रंगीबेरंगी पाहुणे पाहाला मिळतात. या पाहुण्या पक्ष्यांना देश-विदेश, राज्य, प्रदेश यांची सीमा नसते. या काळात आपले नेहमीचे वास्तव्य सोडून हे पक्षी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करतात. जगभरात पक्ष्यांच्या स्थलांतराचा वेध घेण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत.
 
काही पक्ष्यांना बँड बांधून, रेडिओ कॉलर लावून स्थलांतराचा मार्ग शोधण्याते प्रयत्न केले जातात. जगभरातील अनेक संस्थांनी यासाठी अभ्यास प्रकल्प हाती घेतले आहेत. तरीही याबाबतचे कुतूहल पूर्ण शमलेले नाही. हे पक्षी त्यांचे अन्न कमी झाल्यावर ते जिथे मुबलक असेल तिथे स्थलांतर करतात. त्या-त्या परिसरातील बदलते हवामान, त्याल अतिकूलता सोसण्याची तयारी हे पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण ठरते.
 
महाराष्ट्रात दरवर्षी येणार्‍या पाहुण्या फ्लेमिंगोचे म्हणजेच रोहित पक्ष्यांचे नेहमीच आकर्षण असते. काही वर्षांपूर्वी केवळ पक्षी मित्रापुरते हे आकर्षण सीमित होते. आता मात्र पूर्ण किनारपट्टीवर हजारोंच्या थव्यानी आलेले लालसर, करडे, गुलबट फ्लेमिंगो  बघण्यासाठी समुद्र सफरीही केल्या जातात. सैबेरियातून आलेले फ्लेमिंगो कच्छच्या   रणात पाणी आटल्यावर तेथून महाराष्ट्राच्या दिशेने जडण्यास सुरुवात करतात. 
 
स्थलांतर फक्त अपृष्ठवंशीय प्राण्यामध्येच नव्हे तर मोठे जल सस्तन प्राणी जसे हम्पर्बेक डॉल्फिन आणि देवमाशामध्येही पाहायला मिळतात. अन्नाच्या शोधात वा प्रजननस्थळाच्या शोधा दरम्यान हे स्थलांतर करताना आढळतात. मुंबईतील जंगले, तलाव, बागा आणि किनारेसुद्धा हजारो मैल प्रवास करणार्‍या प्राण्यासाठी, समुद्री जीवासाठी नैसर्गिक अधिवास आहेत. प्रजनन काळात समुद्रकिनारी स्थलांतर करणारी ऑलिव्हरिडल ही समुद्री कासव आता दुर्मीळ झाली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत.
म. अ. खाडिलकर

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments