Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिशन काश्मिर २०१९

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (17:14 IST)
आपण सर्वांनीच मिशन काश्मिर हा सीनेमा पाहिलेला आहे. ज्यात हृतिक रोशनचं कुटुंब आर्मी ऑफिसर संजय दत्तच्या हातून मारलं जातं आणि जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा तो आतंकवादी बनतो. ही कथा चित्रपट म्हणून चांगली वाटत असली तरी आणि तो चित्रपट मुळातच चांगला असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. आतंकवादी बनतात ते त्यांच्यावर अत्याचार होतात म्हणून नव्हे तर त्यांना मुस्लिम राष्ट्र स्थापन करायचंय आणि ते कुराणानुसार चालवायचंय व सर्व समाजाला मुस्लिम करायचंय म्हणून. हे सत्य आहे. कुराणात काय चांगलं लिहिलंय वा वाईट लिहिलंय यापेक्षा अतिरेकी असेच तयर होतात. जर कुणा मुस्लिम विद्वानाला कुराणाचे संदेश सकारात्मक वाटत असतील तर त्यांनी ते अतिरेक्यांना व फुटिरतावाद्यांना जाऊन सांगायला हवा. ज्याला रोग झालाय त्याच्यावरच उपचार केले पाहिजे. शेजार्‍यांवर उपचार करुन चालत नाही. आजपर्यंत आपल्याकडे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सहिष्णू असलेल्या हिंदूंना अहिंसेचे डोस पाजले गेले पण जे मुळातच हिंसक आहेत त्यांचा विचार कुणीच केला नाही. वाघ गायीला खातो, तर गायींनी प्रतिकार न करता मुकाट्याने वाघाचं भोजन व्हावं. कधीतरी त्यांना गाय खाण्याचा कंटाळा येईल आणि तो गाय खाणं सोडून देईल अशी हिंदू-मुस्लिम एकता कॉंग्रेसला हवी होती. यात गाय हिंदू हे वेगळं सांगायला नको. पण २०१४ नंतर मात्र परिस्थिती बदलली... मुसलमान समाज भारतीय व्यावहारिक जीवनात मिळून मिसळून राहु शकतो हे पहिल्यांदा २०१४ साली कळू लागलं. मुस्लिम स्त्रीयांना तर नव्या सरकारकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. आपूर्वी राजीव गांधींनी मुस्लिम कट्टर पुरुषांसमोर सरळ सरळ लोटांगण घातलं होतं. जर राजीव ह्यांनी केवळ मतांचा विचार न करता त्यावेळी कठोर पावलं उचलली असती तर कदाचित मोदी युगाचा आरंभच झाला नसता. मोदी युगाचा आरंभ कॉंग्रेसच्या नालायकपणामुळे झालेला आहे. कंस ज्यावेळी माजतो तेव्हा नियती कृष्णाला जन्माला घालण्याचे आराखडे रचत असते. तसं आहे हे...
या सरकारने सुरुवातीला काश्मिर खोर्‍यात पीडीपीशी युती केली आणि काश्मिरच्या राजकारणात प्रत्यक्ष एंट्री मिळवली आणि पीडीपीशी युती करता करताच मिशन काश्मिर सुरु केलं होतं. मिशन काश्मिरला मेहबुबा मुफ्ती ह्यांचा विरोध होता. वेळोवेळी त्या सरकार विरुद्ध बोलत होत्या. पण त्यांच्यासमोर परिस्थिती अशी होती की त्यांना भाजपासोबतची युती तोडताही येत नव्हती कारण काश्मिर खोर्‍यात दुसर्‍या काश्मिरी नेत्यांचं वर्चस्व त्यांना नको होतं... त्यात सत्ता कशी सोडणार? पण मोदी सरकारने संधी सांधून सरकारमधून माघार घेतली आणि पुढे मेहबुबा ह्यांना पुन्हा सरकार स्थापन करता आलं नाही. ओमर अब्दुल्लाह ह्यांनीही सरकार स्थापनेसाठी रुची दाखवली नाही. कदाचित या सर्व काश्मिरी नेत्यांवर केंद्र सरकारचा दबाव तेव्हापासूनच सुरु झाला होता. तो दबाव म्हणजे  त्यांनी कमावलेली संपत्ती... मोदी सरकार आल्यापासनं अनेकांवर ईडी धाडी टाकत आहे. ती धास्ती या कोट्यधीश काश्मिरी नेत्यांना होती, अजूनही आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा तीव्र विरोध केला तर आपल्या घरात ईडीवाले तर घुसणार नाही ना ही भिती त्यांना सतावत होती. दुसरी गोष्ट सरकारने दगडफेक करणार्‍यांवर उत्तम कारवाई केली आहे. पॅलेट गनचा मारा करुन दगडफेक करणार्‍यांना दाखवून दिलं की आता सरकार बदललेलं आहे. हे कॉंग्रेस सरकार नाही. 
 
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे पाकीस्तानलाही कळून चुकलं होतं की आता खरोखर सरकार बदललंय... हे पुचाट आणि नेभळट कॉंग्रेस सरकार नाही. तर हे निर्णयक्षम व छत्रपती शिवरायांच्या तत्वावर चालणारे भाजपा सरकार आहे आणि या सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे संस्कार झालेले आहेत. अनेक फुटिरतावादी लोक संघाला अतिरेकी संघटना म्हणत असताना मात्र संघाने भारतात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली... आज त्याचे परिणाम आपल्याला समोर दिसत आहेत. मोदी सरकारने फुटिरतावादी नेत्यांचा चांगलाच बंदोबस्त केला. हुर्रियत नावाची दळभद्री जमात त्यांनी जवळ जवळ संपवलेली आहे. आज काश्मिरात हुर्रियत असा उच्चार होताना दिसत नाही. ज्यावेली सर्जिकल स्ट्राईक झालं त्यावेळी अनेकांनी सरकारची मस्करी केली. शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी आमच्यावेलीही सर्जिकल स्ट्राईक झाली होती पण आम्ही गाजावाजा केला नाही असं म्हटलं. ह्यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे भ्रष्टाचार करण्याइतकं सोपं वाटतं. असो. एअर स्ट्राईकच्या वेळीही सरकारची खिल्ली उडवण्यात आली. एअर स्ट्राईक बनाव आहे, किती अतिरेकी मेले. राज ठाकरे नावाच्या नेत्याने तर बाळासाहेबांचं नाव मातीत मिळवलं असं म्हणायला हरकत नसावी इतकं विकृत आणि वाह्यात स्टेटमेंट दिलं. म्हणे पुलवामा हा मोदींचा डाव होता, डोवालांची चौकशी झाली पाहिजे. ह्यांचे गोडवे पाकीस्तानात गायले गेले. पण हे मात्र भारतीय जनतेच्या मनातून पार उतरुन गेले. आता बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अशाप्रकारे सर्व ममता बॅनर्जी वगैरे नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएमच्या नावाने बोटं मोडत फिरत आहेत. पण त्यांच्या रक्तात ठाकरेंचं रक्त वाहतंय म्हणून एक मराठी माणूस म्हणून आणि आदरणीय बाळासाहेबांचे संस्कार महाराष्ट्रावर व त्यांच्यावर झालेत म्हणून मी त्यांना आवाहन करतो की एकदा मोदीद्वेषाचा चष्मा डोळ्यांसमोरुन काढून नीट परिस्थिती पाहा. भारतीय जनतेने स्वेच्छेने निवडून दिलेलं हे सरकार आहे. आजपर्यंत आएल्या कोणत्याही सरकारवर जनतेने इतकं प्रेम केलेलं नाही किंवा विश्वासही दाखवलेला नाही...
 
आज काश्मिरमधून ३७० आणि ३५ ए कलम काढून टाकण्यात आलं. हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. या बरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. याशिवाय राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे. अमित शहा यांनी संसदेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकही मांडले. यापैकी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकामध्ये काश्मीरचे लडाख आणि उर्वरित काश्मीर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असेल. तर लडाखमध्ये विधानसभा नसेल. ही घटना भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून ठेवली जाईल... तात्याराव सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर हे भारतीय इतिहासाचं सातवं सोनेरी पान आहे. आज भारत पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. जे पाप गांधी-नेहरुंनी करुन ठेवलं त्या पापातून आज भारतीयांना मुक्ती मिळाली... अखंड भारतही जास्त दूर नाही. होय अखंड भारत... अनेकांना ३७० कलम रद्द होणं हे सुद्धा अशक्य वाटत होतं. अर्थात अखंड भारत आजच्या घडीला सोपं नाही. पण येणार्‍या काळात हे शक्य आहे. शेषराव मोरेंचे भक्त आणि डावे लोक अखंड भारताची मस्करी करतात. कसं करणार कसं करणार हे विचारतात. त्यांना मी इतकंच सांगेन जसं त्रिपल तलाक आणि ३७० जसं केलं तसंच करणार. पण तो काळ अजून दूर आहे. त्याला अजून किमान २५ ते ३० वर्षे लागतील. २५-३० वर्षे फार मोठा काळ नाही. सुरुवातीला बलुचीस्थान टार्गेट असेल, नंतर पाकीस्तानचे असंख्य तुकडे पडणे हे टार्गेट असेल त्यानंतर अखंड भारत शक्य आहे. लक्षात ठेवा माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री श्री. अमित शह हे दोघंही संघाचे स्वयंसेवक होते. संघामध्ये १४ ऑगस्टला अखंड भारतासाठी संकल्प घेतला जातो. मोदी आणि शहा दोघंही साधारण बालपणापासून वा किशोरवयापासून संघात होते. म्हणजेच त्यांनी अनेक वेळा अखंड भारतासाठी संकल्प घेतलेला आहे. ते संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर जो त्यांच्या जागेवर बसेल तोही याच संस्कारातला असेल याची ते काळजी घेतील. म्हणून मी म्हणतोय की अखंड भारत सध्या जरी कठीण वा दूर असला तरी येणार्‍या काळात अखंड भारत शक्य आहे... होय, सिंधू नदी मुक्त होऊ शकते. आपल्याला काय करायचंय तर केवळ देवापुढे हात जोडून प्रार्थना करायचीय आणि या सरकराल बळ मिळेल अशा बहुसंख्य मतांनी पुन्हा पुन्हा निवडून द्यायचंय... दोस्तांनो, जहां हुए बलिदान मुखर्जी वह काश्मिर हमारा है... यह महर्षी कश्यप का काश्मिर है... यह भारतीयोंका काश्मिर हैं... त्या पुढे जाऊन घोष करायचा आहे की एक धक्का और दो, पाकीस्तान तोड दो... 
 
माझ्या तमाम भारतीय भगिनी आणि बंधुंनो, आज देवापुढे एखादा गोड पदार्थ ठेवून नैवेद्य जरुर दाखवा... हिंदू नैवेद्य दाखवतील, ख्रिस्ती बंधू येसूसमोर प्रार्थना करतील, मुस्लिम बांधव नमाज पढतील... प्रत्येक जण आपापल्या उपासना पद्धतीनुसार देवासमोर नस्तमस्तक होतील. पण आपलं ध्येय मात्र एकच आहे बंधूंनो... एक असा बलवान, महान भारत... जो विश्वावर राज्य करेल, ज्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची अमेरिका वा चीन सारख्या बलाढ्य राष्ट्रांचीही हिंमत होणार नाही. भारत सर्वच क्षेत्रात अव्वल राहिल... वसुधैव कुटुंबकम हेच आपले मूळ ध्येय आहे...
 
हर हर महादेव... भारत माता की जय... वंदे मातरम...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक, भारतात गेले 26 वर्षे 'बनावट' म्हणून राहत होता

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

पुढील लेख
Show comments