rashifal-2026

माघार कुणी घ्यायची?

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (16:49 IST)
आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही? 
 
जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? 
 
अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वत:चा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला.
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

समाजवादी पक्षाचे (सपा) नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली

काबूलमध्ये शक्तिशाली स्फोट, ७ जणांचा मृत्यू

नायजेरियात २ चर्चवर हल्ला, १६३ जणांचे अपहरण

LIVE: भाजप नेत्या नवनीत राणा यांना फोन कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

पुढील लेख
Show comments