Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?

Nominee and its Importance
Webdunia
शनिवार, 28 एप्रिल 2018 (14:25 IST)
वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो ! 
 
तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?
 
'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ? 
 
तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ? 
 
तर उत्तर आहे - नाही
 
शॉकिंग ? 
 
खालील उदाहरण पहा ! 
 
महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे. 
 
अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला ! 
 
असे का झाले ? 
 
महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succesion Law'(वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir'(वारसदार) मध्ये  समान वाटणी झाली.
 
'Succession Law' समजून घ्या !
 
'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Hairs ला सुपुर्द करण्यापर्यंत  मर्यादित आहे.
 
नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात. 
 
मग 'Legal Heir' कोण असतात?
 
'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत. 
 
जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succesion Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात. 
 
'Succession Law'चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत. 
 
मित्रानो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. 
 
नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो. 
 
मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे! 
 
आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर मृत्यूपत्र बनवणे अतिशय महत्वाचे असते.
 
सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नाॅमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नाॅमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्राॅपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो. 
 
सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आहे वाचा व वेळीच  सावध व्हा...
 
माधव कुलकर्णी
अँडव्होकेट
मुंबई हायकोर्ट.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

५२ वर्षीय महिला २५ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, कुटुंब सोडून लग्न केले!

What Is Kalma: कलमा म्हणजे काय? पर्यटकांना हे वाचण्याचा आदेश दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला

मोठी कारवाई: पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल आणि आसिफ यांचे घर स्फोटात जमीनदोस्त

LIVE: काश्मीरमधून 500 हून अधिक पर्यटक महाराष्ट्रात परतले

महायुतीमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा: मुख्यमंत्री कार्यालयाने ५०० पर्यटक तर शिवसेनेने ५२० पर्यटकांना परत आणल्याचा दावा केला

पुढील लेख
Show comments