Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळसाठी कुर्बानी...

Webdunia
गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (10:45 IST)
मुसलमानांच्या वैचारिक मागासलेपणावर मी नेहमीच टिका केली आहे. जसे हिंदू आपल्या अभद्र प्रथांना टिका करुन, त्या पालटून पुढे जातात, त्याप्रमाणे मुसलमान समाज सहजासहजी वागत नाही. पूर्वी हिंदू विधवा स्त्रीयांना करण्याची अनुमती नव्हती व त्यांचे केस कापून त्यांना कायमचे विद्रूप करुन ठेवत. पण हिंदू पुरुषांनी पुढे येऊन ही प्रथा मोडून काढली आणि आपल्या स्त्रीयांना मानाचे स्थान दिले. तसे मुसलमान पुरुष तीन तलाक प्रथेपासून आपल्या स्त्रीयांना मुक्त करण्यासाठी पुढे येत नाहीत. उलट कुराणमध्ये काय लिहिलंय याचे दाखले देत बसतात. हा दांभिकपणा जोपर्यंत कोणताही समाज सोडत नाही तोपर्यंत तो समाज, समाज म्हणून सुधरत नाही आणि पुढेही येत नाही. तो समाज मागास राहतो. 
 
पण जशी आपण लोकांवर टिका करतो तशी त्यांच्या स्तुत्य कार्यामुळे स्तुतीही करता आली पाहिजे. जसे राजकारणात कुणी सत्रू नसतो तर केवळ विरोधक असतो. त्याचप्रमाणे समाजकारणातही कुणी शत्रू नसतो तर केवळ विरोधक असतो. सर्व विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. बकरी ईद आली की नेहमी सोशल मीडियावर एक टिकेचा सूर सुरु होतो तो असा की मुसलमान मातीची बकरि कापणार का? बकरी दान करणार का? असा सवाल टिंगल म्हणून उपस्थित केला जातो. हा सवाल जरी चुकीचा असला तरी याला स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणारी लबाड मंडळी जबाबदार आहे. ही पुरोगामी मंडळी हिंदूचे सण आले की लगेच पर्यावरण आदि संदेश हिंदूंना देत राहतात. त्यातल्या काही बाबी खरोखर पाळल्या पाहिजेत या मताचा मी आहे. पण ही मंडळी इतर पंथियांच्या सणावर काहीच बोलत नाही. त्यातल्या वाईट प्रथांवर बोटे ठेवत नाही. म्हणून हिंदूंकडून चिडून असली चुकीची टिका होत राहते. 
 
तर सांगायचा मुद्दा असा की ईदला अशाप्रकारची टिका होत राहते. पण यावेळी पुण्यातील काही तरुणांनी खर्‍या अर्थाने ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आपत्कालात आम्ही जात धर्म भेद विसरुन सहकार्य करतो. ही भारतीयत्वाची भावना या मुस्लिम तरुणांनी उजागर केली आहे. या वेळी बकरीची कुर्बानी न देता केरळच्या पूरग्रस्तांना मदतरुपी कुर्बानी देण्यात यावी असे आवाहन या तरुण मंडळींनी केले. या कल्पनेचा शिल्पकार आहे पैगंबर शेख. पैगंबर शेख हा तरुण माझा फेसबुक मित्र आहे. जसे अनेक मित्रांमध्ये असतात तसे बरेचसे वैचारिक भेद आमच्यात आहेत. ते असोत. केरळसाठी कुर्बानी ही कल्पनाच मुळातच भन्नाट... 
 
पैगंबर शेखने एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांनी केरळसाठी कुरबानीचे आवाहन केले. या उपक्रमात अनेक तरुण जोडले गेले. इम्रान शेख, फईम शेख, सैफ खान, मुवाज मुजावर, शकील शेख, जावेद, अमन या तरुणांनी पैगंबरांना अमूल्य साथ दिली आणि ही रक्कम २५,००० रुपये इतकी झाली. या आवाहनाचे फेसबुक पोस्ट्स इतक्या व्हायरल झाल्या की पाहता पाहता ही रक्कम ८०,००० च्या घरात गेली. सामान्य माणूस कशाप्रकारे समाजकार्य करु शकतो हे पौगंबर शेखने दाखवून दिले आहे. सर्वसामान्य माणूस मोठी क्रांती करु शकत नाही. कारण त्याला घर असतं, बायको असते आणि मूलही असतं. या दैनंदिन जीवनात तो इतका गुंतलेला असतो की तो फेसबुकवर चर्चा करण्यापलीकडे काहीही करु शकत नाही. पण पैगंबरांनी दाखवून दिलं आहे की एक फेसबुक पोस्ट क्रांती घडवू शकते.
 
#कुर्बानी_केरळसाठी या हॅशटॅगवर तुम्ही क्लिक केलंत तर तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकत नसाल तर किमान या तरुणांचे कौतुक केले पाहिजे. जेणेकरुन या तरुणांची पाठ थोपटली जाईल आणि पुढेही ह्यांना असे सत्कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. मुस्लिम तरुण आपल्या धार्मिक संकल्पनेच्या बाहेर पडून काहीतरी सामाजिक कार्य करत आहेत हे कौतुकास्पद आहे. एक सर्वसामान्य, नोकरी करणारा कुटुंबवत्सल तरुण असून पैगंबर शेख यांनी जे कार्य केले आहे त्या कार्याला प्रणाम.
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments