Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहीद थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2024 (14:55 IST)
आज देशभक्त राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांचा स्मृतीदिन. लाहोर जेलमध्ये भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी १९३१ साली फाशी देण्यात आली होती. देशभरात २३ मार्च हा 'शहीद दिन' म्हणून त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मानला जातो. अनेक भारतीयांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तिघेही महान भारतीय क्रांतिकारक होते. इंग्रजांनी त्यांना ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्रलढा पुकारल्यामुळे तरूण वयातच फाशीची शिक्षा दिली. स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही त्यांनी आनंदाने कवटाळले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे भारतमातेसाठी बलीदान करणारर्‍या क्रांतीकारकांमध्ये घेतली जातात. तसेच देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने हे तिन्ही वीर फाशीला सामोरे गेले होते. 
1. भगतसिंग  
पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात भगतसिंग यांचा जन्म २७.९.१९०७ रोजी झाला. भगतसिंग यांच्या लहानपणाचा एक प्रसंग आहे. एकदा ते शेतात गेले होते. तर त्यांनी पाहिले की, एक शेतकरी गहू पेरत होता. तो शेतकरी करत असलेले काम पाहून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारले की, “शेतकरीदादा, तुम्ही गहू या शेतात टाकत का आहात ?” त्यावर शेतकरी म्हणाला की, "जर आपण गहू पेरले तर त्यांची रोप येतील रोपांना गव्हाची कणसे येतील."  मग त्यावर छोटे भगतसिंग म्हणालेत की, "जर आपण बंदुकीच्या गोळ्या शेतात पेरल्या तर त्याचेही रोप येतील का? त्याला बंदूका येतील का?" यावर शेतकरी म्हणाला की, या गोळ्या तुला कशाला हव्या? तेव्हा छोटेसे भगतसिंग बोलले की, इंग्रजांना मारण्यासाठी ज्यांनी हिंदुस्थानचे राज्य बळकावले आहे. असे आवेशपूर्ण उत्तर भगतसिंग यांनी दिले. लहानपणा पासूनच त्यांच्या मनात देशाबद्द्ल प्रेम आणि आपुलकी होती. भगतसिंग यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तसेच देशसेवेसाठी आजन्म अविवाहित रहाण्याची प्रतिज्ञा घरातील सर्व परिस्थिती अनुकूल असतांनाही त्यांनी केली आणि ती निभावली .`नौजवान भारत सभा’, `कीर्ती किसान पार्टी’ आणि `हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनांशी ते संबंधित होते. त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनवली तेव्हा ते त्यांच्या आईला बोलले की, मी फाशी गेलो तरी इंग्रज सत्ता भारतातून काढून टाकण्यासाठी मी एक वर्षाच्या आत पुन्हा जन्म घेईल. तू काळजी करू नकोस. 

2. राजगुरु  
राजगरु यांचे नाव शिवराम हरी राजगुरु होते. यांचा जन्म महाराष्ट्रात पुण्याजवळील खेड येथे एक देशस्थ ब्राह्मण कुटुंबात २४.८.१९०८ रोजी झाला. राजगुरु यांना अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती यांचे जन्मापासून वरदान होते. त्यांना कितीतरी ग्रंथ तोंडीपाठ होते. ते  हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे सदस्य होते. राजगुरु यांना जेव्हा कारागृहात टाकण्यात आले तेव्हा त्यांचा कारागृहात अनन्वित छळ व्हायचा पण ते खूप सहनशील होते. एकदा राजगुरु एका फितुरामुळे पकडले गेले. त्यांचा अनन्वित छळ लाहोरमध्ये करण्यात आला. तीव्र उन्हाळयात लाहोरमध्ये चहूबाजूंनी भट्टया लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. त्यांना खूप मारले देखील गले. खूप त्रास देण्यात आला. पण संयमी, सहनशील आणि कणखर मन असलेल्या राजगुरुंनी सर्व छळ सहन केला. पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाही. त्यांना फाशी देण्यापूर्वी कारागृहातील एक सहकाऱ्यांने त्यांना एक प्रश्न विचारला व त्यावर राजगुरु म्हणाले की, "आमचा प्रवास फासावर चढताच एका क्षणात संपेल; पण बाबांनो  वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला तुम्ही सगळे  निघाले. याचे माला दु:ख वाटते  तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील." राजगुरु यांच्या मनात अफाट देशभक्ती होती.    

3. सुखदेव 
पंजाब राज्यामध्ये सुखदेव थापर यांचा जन्म १५/०५/१९०७ रोजी झाला. सुखदेव यांची प्रमुख ओळख भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी म्हणून होती. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे सुखदेव हे कार्यकारी सदस्य होते. क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या विचारांचा पगडा सुखदेव यांच्यावर होता. त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांतीविषयक, तसेच रशियाच्या क्रांतीविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असतांना एक मंडळ स्थापन केले. त्यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना भगतसिंग, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्या सहयोगाने केली. या सभेची उद्दिष्टे होती की, स्वातंत्र्य लढ्यात युवकांना सहभागी होण्यासाठी उत्कंठित करणे. तसेच शास्त्रीय दृष्टीकोन अंगिकारणे, अस्पृश्यता निवारण आणि साम्यवादाविरुद्ध लढा देणे ही होती. १९२९ मध्ये ख्रिस्ताब्द कारागृहात असतांना होत असलेल्या कारागृहातील सहकार्‍यांच्या अनन्वित छळाच्या विरोधात त्यांचा सहभाग चालू केलेल्या भू्क हरतालातही होता. देशासाठी योगदान देण्यात सुखदेव यांचा सहभाग होता.   

भगतसिंग, राजगरु, सुखदेव या तीन थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळले. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणार्‍या या तिघांना २३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात हसत हसत आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. आज देखील या तिघ क्रांतिकारांचा भारताला अभिमान आहे. भारतवर्षात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे नाव अमर आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

एअर इंडियाचे विमान तासनतास धावपट्टीवर उभे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला व्हिडीओ समोर आले

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वात भ्रष्ट नेत्यांमध्ये असल्याचा संजय राऊत यांचा दावा

आधार अपडेट मोफत करा, या तारखेपर्यंत कोणतेही शुल्क लागणार नाही

पुढील लेख
Show comments